Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

शिरपूर तालुक्यातील तोंदे गावात बनावट खतांच्या साठा जप्त... व्यापाऱ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई....



शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर तालुक्यातील तोंदे गावात सुरू असलेल्या बनावट खतांच्या काळाबाजार रोखण्यात कृषी विभागाला यश आले असून याबाबत बनावट खतांच्या 57 गोण्या जप्त करत थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातेड येथील शेतकरी श्री किशोर आत्माराम पाटील यांनी सदर खत बनावट असल्याबाबत तक्रार केल्यानंतर
कृषी विभागाच्या जळगाव जिल्हा याच्या संयुक्त पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.सदर पथकामध्ये मनोज शिसोदे जिल्हा गूणवत्ता नियंत्रण निरीक्षक धुळे,अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव, दिपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी चोपडा,योगेश गिरासे कृषी अधिकारी शिरपूर यांचा समवेश होता.

या बाबत मनोजकुमार रमेश शिसोदे , जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक द्वारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की चोपडा तालुक्यातील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांनी कृषी विभागाकडे एमओपी या खताच्या गुणवत्तेविषयक कृषी विभागाकडे तक्रार केली होती. म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे जाऊन ता. कुषिअधिकारी चोपडा श्री दिपक भास्करराव साळुखे व अरुण श्रीराम तायडे यानी सदर शेतकरीकडे जाउन MOP म्युरिएट ऑफ पोटॅश या खताची बॅगची व त्यामधील खताची तपासणी केली असता त्याना MOP म्युरिएट ऑफ पोटॅश या खताबाबत बनावट असल्याचे प्रथम दर्शनी आढळले त्यानतंर त्यानी शेतक-यास विचारले असता त्यांनी सांगितले की मंगलचंद झुंबरलाल जैन मु.पो.तोंदे ता शिरपुर यानी त्याना सदरचे MOP खताच्या 7 बॅग रु 1700 रु दराने आणुन दिल्या होत्या सदर खताची पावती अथवा बिल दिले नव्हते शेतक-याला विश्वासात घेउन पुढील कार्यवाही साठी सदर खताच्या पिशव्या परत करण्यास सांगितले होते.

यासाठी साफळा रचून संशयीत ठिकाणी म्हणजे सुरजमल मोहनलाल जैन यांच्या किराणा दुकानाच्या गोदामात छापा मारला असता त्या ठिकाणी MOP (murite of potash) IPLकंपनीच्या बनावट खताच्या 57 बॅग प्रति बॅग 50 किलो वजनाच्या आढळुन आल्या खताच्या बॅग्जच्या निरीक्षण केले असता MOP ( murite of potash )IPLकंपनीची नक्कल केल्याचे प्रथमदशी दिसुन आले सदर खतबॅग्ज वर BATCH NO आढळुन आला नसुन PACKED DATE JULY IPLकंपनी 2022अशी आढळुन आली व ORIGINAL BAGS चा रंग व नकली बॅग्जचा रंग व छपाइ या मध्ये बरीच तफावत आढळुन आली सदर गोडाउन मालकास विचारले असता त्याने सांगितले की सदरचा खत साठा हा श्री कैलास वासुदेव पाटील रा तोंदे यानी माझा घरात कापूस भरलेला असुन खते ठेवण्यासाठी जागा नाही. काही दिवस खत राहू दया अशी विनंती केल्याणे मी ती खते ठेवली आहेत.असा लेखी कबूली जबाब श्री सुरजमल मोहनलाल जैन यांनी दिला त्यावरून श्री कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट MOP ( murite of potash ) विक्रीसाठी आणले हे सिध्द होते श्री कैलास पाटील यांना श्री सुरजमल जैन यांच्या भ्रमाण ध्वनी वरुन विचारणा केली असता सदरचे रा.खते हे किशोर शालीकराव पाटील रा. करवंद यांनी बिगर बीलाचे दिले असल्याचे सांगत इतर उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे या खताबाबत बनावाट असल्याचे पक्केमत झाले.वरील दोन्ही शासकीय पंच व गावातील प्रतीष्टीत व्यक्ती समक्ष IPL कंपनीच्या MOP (murite of potash ) यांखताचा नमुना तीन प्रतीत (450 ग्रॅम वजनाचा नमुना काढून एक नमुना खत चाचनी प्रयोग शाळा नाशिक येथे पाठिवण्याची तजवीज करण्यात आली. व शिल्लक साठा MOP खताच्या 57 बॅग प्रति बॅग 50 किलो वजनाची, प्रति बॅग किमंत 1700रु असा एकुण मुददेमाल 96,900 (श्याहण्णव हजार नउशे ) किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच गोडावून मध्ये ठेवुन गोडाउन पंचासमक्ष सिलबंद केले व गोडाउनची चाबी श्री सुरजमल मोहनलाल जैन यांचेकडे सुपूर्द करून खतसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी सपुर्द करुन खतसाठा सुरक्षित ठेवणे बाबत सुचित करण्यात आले आहे. याबाबत रीतसर पंचनामा करून कबुली जवाब देखील घेण्यात आला आहे.

सदरच्या आरोपींनी संगनमताने नकली MOP (murite of potash ) खत शेतक-यांना विक्रीसाठी आणल्याने शेतक-याची व शासनाची फसवणुक केल्याने खालील आरोपींन विरुध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे.

1) मंगलचंद झुंबरलाल जैन रा.तोंदे ता.शिरपुर जि.धुळे 2) कैलास वासुदेव पाटील रा.तोंदे ता.शिरपुर जि.धुळे 3). किशोर शालिकराव पाटील रा.करवंद ता.शिरपुर जि.धुळे यांचे विरुध्द माझी भादवि कलम 420, 468 खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 7, 8, 19(अ), 19 (क) (2) 19(क) (3) (6) 35 (1) (अ),35 (1) (ब) व जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 मधील कलम 3(2)(ड),7,9,10 नुसार फिर्याद दाखल केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मोहन वाघ सो., विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धुळे कुरबान तडवी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जळगाव संभाजी ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज शिसोदे जिल्हा गूणवत्ता नियंत्रण निरीक्षक धुळे, अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव, दिपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी चोपडा, योगेश गिरासे कृषी अधिकारी शिरपूर कारवाई केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध