Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ एप्रिल, २०२३

साक्री तालुक्यातील शेनपूर येथे पवनपुत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला



काल दिनांक 6/4/2023. रोजी मौजे शेणपूर येथे बजरंग बली हनुमान जन्म महोत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला शेणपूर गावातील सर्व नागरिक भक्तगण महिला अबाल वृद्धांसह सर्व या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते यावेळी मंदिरावर महापूजा करून रोशनाई करण्यात आली व सायंकाळी गावातील नागरिकांकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण व नामस्मरण करण्यात आले तसेच त्यानंतर हनुमान रायांच्या आरतीचा मान गावातील हनुमान भक्त अमिन जुम्मा पिंजारी यांना देण्यात आला यामुळे गावातील सामाजिक एक्य व सर्वधर्म समभाव याची प्रचिती दिसून आली विविध जाती धर्म ची लोक या गावात अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत याची अनुभूती यातून दिसून आली. सर्व मतभेद विसरून गावातील नागरिकांनी आपापल्या परीने सहकार्य केले सायंकाळी सात वाजेला महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. गावातील सगळे सर्व नागरिकांच्या सहकार्याने व दिलेल्या लोकवर्गणीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.जय हनुमान,जय श्रीराम,या जयघोषाने परिसर पूर्ण दुमदुमून गेला होता गावात वर्षातून दोन मोठे कार्यक्रम होत असतात ते म्हणजे पारायण सप्ताह आणि हनुमान जयंती यामुळे शेणपूर गाव किती धार्मिक आहे याचीही आठवण होते सालाबादप्रमाणे यावर्षीही हनुमान जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला.यामध्ये मुख्यत्वे गावातील तरुण मित्रमंडळी चे
मोठे योगदान मिळाले असल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.या कार्यक्रमात गावातील शेकडो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व सर्वांच्या सहकार्याने व उपस्थितीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध