Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ एप्रिल, २०२३

ऑर्चिड इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल पेरेजपूर साक्री यांच्यावतीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले



काल दि. 8.4.2023 वार शनीवार रोजी सायंकाळी 5.30 वाजता आमच्या ऑर्कीड अॅकडमी स्कुलचा वार्षिक पालक मेळावा संपन्न झाला.यात ऑर्कीड अॅकडमी स्कुलच्या शैक्षणीक प्रगती विषयी पालक वर्गाने अतिशय समाधान व्यक्त केले. पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जी प्रगती पाहिली त्याचं पूर्ण श्रेय ऑर्चिड इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल ला जाते व मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम येथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी नेहमीच केलेले आहे विविध सामाजिक धार्मिक उपक्रम क्रीडा क्षेत्रात विविध खेळांचे प्रशिक्षण तसेच मुलांमधील असणाऱ्या कौशल्याला वाव देण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येते त्याचप्रमाणे पालकवर्गाने ज्या काही सुचना मांडल्या त्या शाळाप्रशासनाने दखल घेवुन योग्य त्या कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी अतिशय आनंदी वातावरणात स्कुलच्या भविष्यातील प्रगतीविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी उपस्थीत संस्थेचे चेअरमन इंजी.मनोजकुमार भास्करराव देसले.संस्थेच्या सेक्रेटरी सौ.श्वेता मनोजकुमार देसले.स्कुलच्या प्रिंसीपल सौ .पुजा पंजाबी मॅडम,प्रिंसीपल सौ.योजना देसले मॅडम,शिक्षक शिक्षीका वृंद व उपस्थीत पालक वर्ग.ऑर्कीड अॅकडमी इंग्लिश मीडियम स्कूल पेरेजपूर रोड.ता साक्री जि. धुळे यांच्याकडून सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध