Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ एप्रिल, २०२३

बागलांचा शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला कोट्यावधी रुपयांच्या फळबागांचे अतोनात नुकसान* *आमदार बोरसे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतकऱ्यांना दिले भरीव मदतीचे आश्वासन



नाशिक जिल्यातील बागलाण तालुक्यात मागील तीन चार दिवसा पूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि काल पुन्हा सायंकाळी बेमोसमी पाऊस व गारपिटीने झोडपले.आसखेडा,जायखेडा,कर्णझाड़, गोराणे,बिजोटे,अशा दहा ते बारा गावांना पावसाने वादळी वाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे त्यात शेतकऱ्यांचा कांदा,द्राक्ष, डाळिंब,कांदाचाळी तसेच पत्र्याचे शेड गुरे डोरे तसेच विजेचा तर पोल विद्युत ट्रांसफार्मर आदी पिकांची आतोनात नुकसान झाले,तर काही घरे पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत त्यामुळे भविष्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे बागलाण तालुक्यातील कांदा,डाळिंब आणि द्राक्ष हे पिके प्रामुख्याने केले जातात आणि या तिन्ही पिकांना खूप मोठा पैसा बॅंकेचा मार्फत उभा करून पिके जोपासली जातात आणि आज हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला या वादळी वाऱ्याने पावसाने व गारपिटीने शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे ,बळीराजा च्या अस्मानी संकटात बागलाण तालुक्याचे आमदार मा.श्री.दिलीप बोरसे साहेब स्वतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन च्या बांधावर जाऊन पाहणी केली.व प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला दिलेत. तरी राज्य सरकारने लवकरात लवकर या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी भरीव मदतीची तरतूद करावी अशी सरकार दरबारी घराणे आपण मांडू असेही आश्वासन यावेळी आमदारांनी शेतकऱ्यांना दिले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध