Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० एप्रिल, २०२३

साक्री तालुक्यातील शेणपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्ताने राज्य सरकार कडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला



आज दिनांक 10/4/2023.रोजी मौजे शेणपूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथे रेशन दुकान क्रमांक 51 येथे आज शेणपूर गावातील रेशन लाभार्थ्यांना आनंदाचा वाटप करण्यात आला आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासना च्या पुरवठा मंत्रालयाकडून साक्री तालुक्यात सर्व गावांमध्ये पिवळे रेशन कार्ड लाभार्थ्यांना या आनंदाच्या शिधा वाटप करण्यात आला शेणपूर गावात एकूण 200 ते 250 कुटुंबांना एक किलो साखर एक किलो तेल एक किलो रवा आणि एक किलो दाळ असे एक किट शासकीय किमतीत म्हणजेच 100 रुपयात लाभार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गरीब मागासवर्गीय दलित आदिवासी इतर मागासवर्गीय अपंग निराधार कुटुंबीयाना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे राज्य सरकार ने यापूर्वीच म्हणजेच दिवाळीला देखील अशा आनंदाच्या शिधा वाटप रेशन कार्ड लाभार्थ्यांना केला होता शासन नेहमीच गोरगरिबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे असे यातून दिसून येते

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध