Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ एप्रिल, २०२३
जि.प सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांचा राजीनामा...!
आत्ताच नुकत्या काही दिवसांपूर्वी चिमठाणे गटातील जिल्हा परिषद सदस्य असलेले वीरेंद्र सिंग गिरासे यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र घोषित केले आहे.
त्यानंतर लागलीच शिंदखेडा मेथी गटातील जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी आपला जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने शिंदखेडा तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे काल सायंकाळी ज्ञानेश्वर भामरे यांनी एक पत्र काढून ही माहिती दिली आहे.
गेल्या तीन वर्षात अनेक कामे सूचवूनही ते कामे होत नाही,भूमिपूजन झालेली कामेही अपुर्णावस्थेत आहे. अशा परिस्थतीत जि.प.सदस्य म्हणून राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत शिंदखेडा तालुक्यातील मेथी गटातील भाजपचे जि.प.सदस्य ज्ञानेश्वर आनंदराव भामरे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा धुळे जि. प. अध्यक्ष अश्विनी पवार यांना पाठविलेला आहे. तसचे त्यांनी भाजपा सदस्त्वाचा ही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
ज्ञानेश्वर भामरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,मेथी गटाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी गेल्या तीन वर्षापासून काम करतोय.ग्रामीण भागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधांबाबतचे प्रश्न मी सातत्याने जिल्हा परिषदेच्या विषय विषय समिती, सर्वसाधारण सभा सभेत मांडण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे शेतकऱ्यांवर या धुळे जिल्हा परिषद मध्ये गुन्हे दाखल केले गेले, अशा प्रकारचा अन्याय गेल्या तीन साडे तीन वर्षात होत आला आहे.
तसेच मी सांगितलेली कामे प्रशासनाने नोंदवून घेतली. काही वेळा ती कामे मंजूर झाले असे सांगण्यात आले. पण नंतर ती कामे सुरु करण्याच्या संबंधाने कुठलीही हालचाल झाले नाही.
त्यामुळे नागरिकांचा रोष आणि नाराजी लक्षात घेता मला नैतिक पातळीवर भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहण्याचा अधिकार उरत नाही.त्यामुळे मी जिल्हा परिषदेचे अध्यक्षांकडे माझ्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. हा राजीनामा मंजूर करावी करावा अशी त्यांनी केली आहे.तसेच त्यांनी भाजपचाही राजीनामा दिला आहे.
यापुढे जनतेला अपेक्षित काम करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे पत्रकात म्हटले आहे. ज्ञानेश्वर भामरे यांनी दिलेल्या राजीनामामुळे भारतीय जनता पक्षाला शिंदखेडा मतदारसंघा मध्ये मोठा फटका बसला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या या राजीनामामुळे भारतीय जनता पक्षाला किती नुकसान होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा