Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयामुळे खाजगी प्रवासी वाहन चालकांवर उपासमारीची वेळ... महाराष्ट्र शासन याकडे लक्ष देणार का? सर्वोच्च काळजी वाहन चालकांचा प्रश्न



तरुण गर्जना वृत्तपत्र :- सध्यास्थितीत भारत जगाच्या पाठीवरील लोकसंख्येत नंबर एकचा देश बनलेला आहे.वाढती लोकसंख्या व नोकरीसाठी असलेल्या अत्यल्प जागा यामुळे भारतात सुशिक्षित व बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.त्यामुळे बरेचसे बेरोजगार युवक स्वतःच्या पोटापाण्यासाठी व परिवाराचा उदरनिर्वाहासाठी खाजगी प्रवासी वाहतूकीच्या व्यवसायाकडे वळले आहेत.या युवकांनी स्थानिक बँका किंवा पतसंस्थांकडून कर्ज घेऊन ॲपे रिक्षा, टॅक्सी व जीप अशा वाहनांचा शासन परवाना काढून प्रवासी वाहतूक करतात.व यातून मिळणारा उत्पन्नातून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतात.या एका वाहन चालकांमुळे कमीत कमी चार ते पाच लोकांचे कुटुंब आनंदात जीवन जगत होते.
  
परंतु महाराष्ट्र शासनाने बदललेल्या निर्णयामुळे,म्हणजेच ७५ वर्षे वरील जेष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट यामुळे आता कुणीही त्या खाजगी वाहनातून प्रवास करत नाही.त्यामुळे सर्वच खाजगी वाहन चालक तासन तास संबंधित स्टेशन किंवा स्टॉप वरती थांबून शेवटी सायंकाळी निराश होऊन घरी परततात.हे खाजगी प्रवासी वाहन चालक शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करतात तरीसुद्धा आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

व तीही केवळ महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे.या वाहन चालकांच्या मते महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो परंतु आमच्या रोजगाराचे काय ? आमच्यामुळे आमचे संपुर्ण कुटुंब उदरनिर्वाह चालतो,मुले शाळेत जातात त्यांचा शिक्षणाचा खर्च कसा करावा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

शासनाच्या निर्णयाने आम्हा खाजगी वाहन चालकांना पूर्णपणे बेरोजगार व उपासमारीची वेळ आणली. असे त्यांनी म्हणणे मांडले आहे. 
       
त्यातच कर्ज काढून घेतलेल्या वाहनाचे हप्ते कसे फेडावे ? याबाबत शासनाने आम्हाला न्याय द्यावा व आमच्याकडे लक्ष द्यावे किंवा आम्हाला काही तरी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
या वाहन चालकांच्या घरी वयोवृद्ध असलेले आई-वडील, त्यांचा उदरनिर्वाह व दवाखान्याचा खर्च, मुलांची शिक्षण, त्यांची शालेय फी, दैनंदिन खर्च, वाहनाची देखभाल हा सर्व खर्च कसा करावा ? अशा अनेक प्रश्न व समस्या त्यांच्या समोर आहेत यातून काय मार्ग काढावा हे सर्व प्रश्न चालकांच्या समोर आज उभे राहिले आहेत. 
आज जिल्ह्यात व तालुक्यात असलेल्या खाजगी प्रवासी वाहनचालकांची व त्यावर अवलंबून असलेल्या परिवारांची संख्या मोजता येणार नाही एवढी आहे. तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर कितीतरी खाजगी प्रवासी वाहन चालकांचे व त्यांच्या परिवाराचे भविष्य आज अंधारात गेले आहे.याबाबत शासनाने काहीतरी विचार करावा व या चालकांना नवीन रोजगार उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आमचे कुटुंब चालवणे सोयीची होईल असे मत सर्वोच्च चालक व्यक्त करत आहे. 
    
तरी महाराष्ट्र शासनाने चालकांचा विचार करून त्यांना रोजगार मिळेल त्यातून त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह होऊ शकेल या पद्धतीने योग्य उचित निर्णय घ्यावा अशी समस्त खाजगी प्रवासी वाहन चालकांच्या वतीने आमच्या तरुण गर्जना वृत्तसेवेच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे शासना पर्यंत पोचवावे अशी विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध