Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

सबका साथ सबका विकास हेच ध्येय उराशी बाळगून इंजि मोहनराव सूर्यवंशी ठरणार भाजपाचे साक्री विधानसभेचे भावी आमदार



सबका साथ सबका विकास हेच ध्येय इंजि मोहनराव सूर्यवंशी माळ माथ्यावरील एक कर्तव्यदक्ष सामाजिक व राजकीय कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख तालुक्यात आहे
सबका साथ सबका विकास हेच ध्येय सोबत घेऊन राजकीय वाटचाल सुरु केली आहे मी स्वतः हेच तत्व आज पावतो पाळलेले आहे असे इंजि मोहनराव सूर्यवंशी यांनी सांगितले साक्री तालुक्यातील सुरपान,छाडवेल(प.) दातरती येथे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या महत्वाकांक्षी आभा योजनेतून 360 लाभार्थ्यांना मोफत आभा कार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते इंजि मोहनराव सूर्यवंशी पुढे म्हणाले की आपले सरकार नसतांना सुध्दा साक्री विधानसभा मतदार संघात विकास निधी खेचून आणण्यात कमी पडलो नाही आता तर देशात राज्यात व जिल्ह्यात देखील आपलेच सरकार आहे राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्या पासुन अनेक कामे प्रगती पथावर आहेत आगामी वर्ष भरात विधानसभा मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते, पेय जल योजनेतून हर घर नळ से जल पिण्यासाठी शाश्वत पाणी ,शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी ,वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच पैसे वाचुन कोणताही रूग्ण दगवू नये या साठी आभा आयुष्यमान भारत योजना मतदारसंघातील प्रत्येक नागरिका पर्यंत पोहचवण्याचा मानस आहे. ज्या ज्या वेळी भ.जा.प.च्या हातात सत्ता असते त्या त्या वेळी सर्व सामान्य व गरजू कुटुंबाला सक्षमपणे उभे करण्याचे काम केले आहे. या वेळी भा.ज.प.साक्री मंडळ अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे युवा नेते निखिल सूर्यवंशी भाऊसाहेब बच्छाव सुरपान चे सरपंच सर्व बूथ प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनोज सोनवणे यांनी केले. तालुक्यातील अनेक गरीब नागरिकांना शिधापत्रिका मिळून देणे तसेच विविध योजनांची माहिती देऊन त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक काम रावसाहेबांकडून पूर्ववत सुरू ठेवले आहे अत्यंत मितभाषी आणि प्रामाणिक सोज्वळ तसेच भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नसलेलं एक व्हाईट कॉलर नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेला आहे म्हणून सर्व तालुका वाशीयांनी येणाऱ्या विधानसभेत आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात टाकावी 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध