Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती टेंभे ची कार्यकारीणी जाहीर,अध्यक्षपदी निलेश कढरे तर सचिवपदी अजय कढरे



शिरपूर प्रतिनिधी :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उत्सव समिती टेंभे बु ची कार्यकारीणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी निलेश झगडू कढरे तर सचिवपदी अजय नवल कढरे यांची निवड करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील टेंभे बु येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बैठक घेण्यात आली. 

यावेळी १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मानवंदनेच्या कार्यक्रम व २० एप्रिल रोजी गावात मिरवणूक काढून जयंती जल्लोषात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले. 

उत्सव समिती कार्यकारिणी :
अध्यक्ष निलेश झगडू कढरे, सचिव अजय नवल कढरे, उपाध्यक्ष सुरेश अशोक कढरे, भाऊसाहेब दिलीप ढोढरे, कोषाध्यक्ष दिनेश ईश्वर कढरे, खजिनदार गौतम नाना कढरे, सदस्य भैय्या सुरेश कढरे, मोहन भिमराव कढरे, सागर संजय कढरे, मनोहर छोटू कढरे, महिला सदस्य अंजना भैय्या कढरे यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध