Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा धुळे पॅटर्न सध्या चर्चेत; खुल्या मैदानावर लेखी परीक्षा,२० हून अधिक कॅमेऱ्यांची नजर

पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा धुळे पॅटर्न सध्या चर्चेत आहे.धुळ्यात पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा झाली.ही परीक्षा अतिशय चोख बंदोबस्तात झाली.पोलीस अधीक्षकांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं.

धुळे प्रतिनिधी :- धुळे जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पोलीस शिपाई व चालक या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली.धुळे जिल्ह्यातील ४२ पदांसाठी ५०५ महिला आणि पुरुष उमेदवार लेखी परीक्षेत सहभागी झाले आहेत. सकाळी सात वाजेपासून या परीक्षेला सुरुवात करण्यात आली होती.परीक्षेसाठी आलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना परीक्षेच्या ठिकाणी सोडण्यात आले.

शहरातील पोलीस मुख्यालयात होत असलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडावी याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.खुल्या मैदानात ही परीक्षा घेण्यात येत असून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत ही परीक्षा पार पडली. यावेळी जिल्हा पोलिसांनी २० हून अधिक कॅमेरे या परीक्षेच्या वेळी लावले होते.तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध