Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या 18 जागांसाठी आज अखेर 61 अर्ज दाखल...
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या 18 जागांसाठी आज अखेर 61 अर्ज दाखल...
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या 18 जागांसाठी आज अखेर 61 अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर आमदार अमरीशभाई पटेल गटातर्फे अधिकृत 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
बाजार समितीच्या संचालकपदाच्या 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून 31 मार्चअखेर सात जणांनी अर्ज दाखल केले होते.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल गटातर्फे उमेदवारी दाखल करण्यात आली.
गटनिहाय दाखल अर्जसंख्या अशी :
सोसायटी मतदारसंघ : या मतदारसंघातील सर्वसाधारण गटात 19, महिला राखीव गटात 4, इतर मागासवर्गीय गटात 3 तर अनुसूचित जमाती गटातून 5 जणांनी अर्ज दाखल केले.
ग्रामपंचायत मतदारसंघ : या मतदारसंघातील सर्वसाधारण गटात 4, अनुसूचित जाती-जमाती गटात 5 तर आर्थिक दुर्बल गटात 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
व्यापारी मतदारसंघ : या मतदारसंघातून 6 जणांनी 10 अर्ज दाखल केले.
हमाल-मापाडी मतदारसंघ : या मतदारसंघासाठी 5 जणांनी 6 अर्ज दाखल केले.
आ.अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील गटाचे उमेदवार असे :
सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण : कांतीलाल दगा पाटील, किरण बद्रीनाथ गुजराथी, अरविंददास आनंदा पाटील, विठोबा सीताराम महाजन, शांतीलाल इंद्रसिंह जमादार, शिवाजी धनगर पाटील, चंद्रकांत (चंदू) धोंडू पाटील.
महिला राखीव : मेघा राजेंद्र पाटील, मनीषा राजकपूर मराठे.
इतर मागासवर्गीय : प्रसाद मोहन पाटील.
अनुसूचित जमाती : कृष्णा गेंदाराम पावरा.
ग्रामपंचायत मतदारसंघ : सर्वसाधारण : लक्ष्मीकांत बापूराव पाटील, आनंदसिंह दर्यावसिंह राऊळ.
आर्थिक दुर्बल घटक : मिलिंद दौलतराव बोरसे (पाटील).
अनुसूचित जाती-जमाती : जगन सुपा पावरा.
व्यापारी मतदारसंघ व हमाल मापाडी मतदारसंघाचे उमेदवार माघारीच्या नंतर जाहीर होतील.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांसोबत माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, स्वीय सहायक अशोक कलाल आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा