Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बळीराजा पॅनलचा 18 पैकी 16 जागावर दणदणीत विजय, साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का
साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बळीराजा पॅनलचा 18 पैकी 16 जागावर दणदणीत विजय, साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का
साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी काल सकाळी ८ वाजता येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या केंद्रात
मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 93 % मतदान झाले आहे.तर दोन्ही गटाच्या समर्थकांसह मतदारांची केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.मतदानानंतर कालच सायंकाळी ५ वाजता साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतमोजणीला सुरुवात झाली व रात्री उशिरा 9 वाजता निकाल घोषीत करण्यात आले. १८ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात असून शेतकरी विकास पॅनल व बळीराजा विकास पॅनल या दोन्ही पॅनलमध्ये सरळ चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीकडे तालुक्याचे व जिल्ह्याचे लक्ष लागले होते.तर प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आता मतदार आपला कौल नेमका कोणाला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळाताई गावित, भाजपचे सुरेश पाटील विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते,माजी खासदार बापू चौरे तसेच शिवसेनेचे विशाल देसले यांच्यात गटात होणार चुरस पहावयास मिळाली
दोन्ही पॅनलमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असल्याने सत्ता कोणत्या पक्षाकडे जाणार यापेक्षा कोणत्या गटाकडे जाणार त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र साक्री तालुक्याच्या विद्यमान अपक्ष शिंदे गटाच्या मंजुळाताई गावित यांना जबरदस्त झटका देत 18 पैकी 16 जागांवर बळीराजा पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत तर शेेतकरी विकास पॅनल ला केेवेळ दोन जागा मिळल्या तर धुळे परिषदचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते व कासारेचे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले व माजी खासदार बापू चौरे यांच्या गटाचा मोठा विजय झाला आहे आमदार मंजुळा गावित यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो येणाऱ्या काळात विध्यमान शिंदे गटाचा आमदार मंजुळा गावित त्यांच्या अडचणी वाढू शकते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा