Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ.कुणाल पाटलांचे वर्चस्व,भाजपाचा पराभव.....!! पुन्हा एकदा कुणाल पाटील किंग मेकर,पाटलांचा लाटेत बाळासाहेब भदाणे यांचा सुपडा साफ....!! महाविकास आघाडीचा 16 पैकी 15 जागांवर विजय....!!
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ.कुणाल पाटलांचे वर्चस्व,भाजपाचा पराभव.....!! पुन्हा एकदा कुणाल पाटील किंग मेकर,पाटलांचा लाटेत बाळासाहेब भदाणे यांचा सुपडा साफ....!! महाविकास आघाडीचा 16 पैकी 15 जागांवर विजय....!!
धुळे - धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत आज निकालाच्या दिवशी आमदार कुणाल पाटलां च्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे पॅनल विजय झाले आहे.तर भाजपाला या निवडणुकीत मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे.16 पैकी पंधरा जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली असून केवळ एकच जागेवर भाजपाला समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीचा विजय झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुलालाची उधळण करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार असा जल्लोष केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकी कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत भाजपा खासदार सुभाष भामरे व आमदार कुणाल पाटील यांचे प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा कुणाल पाटलांवर विश्वास दाखवत महाविकास आघाडीचे पॅनल निवडून दिले. या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे दिसुन आले आहे.
या निवडणुकीत दोन्ही पक्षाचे नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी भाजपाला नाकारत भाजपाचा दारून पराभव झाला आहे. आमदार कुणाल पाटलांच्या लाटेत भाजपचा सुपडा साफ झाला असून शिंदे गटाच्या बाळासाहेब भदाणे यांचा देखील पराभव झाला आहे. या निवडणुकीकरिता दोन्ही पक्षाने कदावे प्रतिदावे केले होते. मात्र मतदार राजाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे पॅनल निवडून दिले आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांची सत्ता राखण्यात आमदार पाटील यांना यश आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा