Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळ्यात बनावट दारू कारखान्यावर छापा 90 हजार 714 रुपयाचा मुद्देमाल जप्त, पीआय दत्तात्रय शिंदे यांची दमदार कारवाई.......
धुळ्यात बनावट दारू कारखान्यावर छापा 90 हजार 714 रुपयाचा मुद्देमाल जप्त, पीआय दत्तात्रय शिंदे यांची दमदार कारवाई.......
धुळे - धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तालुक्यातील मोराणे गावाच्या शिवारामध्ये बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून 90 हजार 714 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या कारवाईत तीन आरोपींना अटक केली आहे.
या दमदार कारवाईमुळे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पीआय दत्तात्रय शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे तोंड भरून कौतुकही केले जात आहे...........
धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पीआय दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोराणे गावाचे शिवारामध्ये श्री. संस्कार मतिमंद मुलींचे बालगृहाच्या समोर एका बंद घरामध्ये बेकायदेशिर व आरोग्यास हानिकारक व बनावट दारू बनवत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी दोन पंचासमक्ष बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकून कारवाई केली असता, सदर ठिकाणी तिन इसम बनावट दारु बनविताना साहित्यनिशी आढळून आले. त्यात मलिंदर सिंग गुरुमुखसिंग शिखलकर, रमेश गोविंदा गायकवाड, भिलु भिवराज साळवे असे तिघे राहणार धुळे यांना ताब्यात घेऊन कारखान्या तील बनावट दारू सह साहित्य असा एकूण 90 हजार 7 14 रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त केला.....
तसेच सदरची बनावट दारु ही युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड युनिट बारामती पिंपली महाराष्ट्र 413102 यांचे नावे बनलेली दिसत असून त्यावर लायसन क्र. 10013043000623 असे असल्याचा दिसत आहे.
अशा प्रकारे धुळे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी अशांनी बनावट दारु निर्मिती कारखाना उघडकी आणला असून या आरोपींविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पोलीस अधिक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच विजय जाधव,सुनिल विंचूरकर,पोहेकॉ रविंद्र राजपुत, तसेच रविंद्र सोनवणे, राकेश मोरे कांतीलाल शिरसाठ यांनी केली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा