Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय हांडे साहेब यांचे सामाजिक कामात मोलाचे सहकार्य मुलींच्या मदतीने इतर शासकीय अधिकाऱ्यांसमोर उभा केला एक आदर्श !
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय हांडे साहेब यांचे सामाजिक कामात मोलाचे सहकार्य मुलींच्या मदतीने इतर शासकीय अधिकाऱ्यांसमोर उभा केला एक आदर्श !
शिरपूर प्रतिनिधी महाराष्ट्र आज १ दिन निमित्ताने नालंदा एज्युकेशन सोसायटी शिरपूर संचलित,प्रियदर्शनी मुला मुलींची निवासी मूकबधिर विद्यालय शिरपूर येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी ध्वजारोहण संजय हांडे साहेब ( निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विभाग शिरपूर) व त्यांच्या धर्मपत्नी सौ.हांडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी भूमी फाऊंडेशन चेन्नई शाखा पुणे यांच्या सौजन्याने संजय हांडे साहेब व त्यांची मुलगी कु.वेदश्री हांडे यांच्या अथक प्रयत्नाने ४ संगणक संच शाळेला भेट म्हणून मिळाले.त्या प्रसंगी संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले.त्यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजय देशमुख सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,चर्चचे फादर एबी एल जंबिलसा, राज्य उत्पादन शुल्क शिरपूर देवरे आण्णा, पत्रकार संतोष भोई,पालक मेहमूद शेख, शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
याबाबत आमचे तरुण गर्जना वृत्तसेवेचे प्रतिनिधी यांनी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक हांडे साहेब त्यांचे मनोगत घेतले असता त्यांचे समाजकार्यात असलेले मन व भावना अत्यंत प्रेमळपणे प्रकट केल्यात.यातून समाजातील इतर शासकीय कर्मचारी व उच्च पदस्थ अधिकारी यांनी देखील आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना समोर ठेवून समाजाप्रती सहकार्य करावे.असा एक आदर्श त्यांनी समाजासमोर उभा केला आहे.ते म्हणाले की भूमी एनजीओ व प्रियदर्शनी मूक बधिर विद्यालय शिरपूर मध्ये एक समन्वयकाची भूमिका बजावून मी सदर विद्यालयास एक विशेष बाब म्हणून मुलांच्या सर्वागीण प्रगतीसाठी प्रयत्न करून ४ संगणक संच व इतर साहित्य मिळवून दिले आहेत...त्यामध्ये भूमी एनजीओ चे संघटक माझी मुलगी कु.वेदश्री हांडे व प्रियदर्शनी विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर व त्यांचे सहकारी यांची मोलाची भूमिका आहे.मी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरपूर येथे काम करत असताना शासकीय कामाबरोबर समोरच असणाऱ्या मूक बधिर विद्यालयातील मुलांच्या गरजा ओळखून आवश्यक ते साहित्य विविध संस्थांमार्फत मिळून दिल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य,आनंद,समाधान यातुन आपलेपणाची झालेली जाणीव पाहून त्यांच्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मला आत्मिक समाधान वाटते
खरोखरच समाजात अशा सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे ज्यामुळे समाजातील तळागाळातील गोरगरीब अंध,अपंग,मूकबधिर असे दिव्यांग मुलांचा विकास होऊ शकतो.त्यांच्या या कार्याला आमचा सलाम आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा