Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ मे, २०२३

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांच्या इडी कारवाई विरोधात राष्ट्रवादी आक्रमक....!! धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने.....!!



धुळे - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी कार्यालयाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या ईडी कारवाईच्या विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. घोषणाबाजी मुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दनाणून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.भाजपाने ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्रास देऊन नाहक बदनामी करण्याचा प्रकार भाजपा व शिंदे गटाने चालविला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांएवजी भाजपाशी निगडित असलेल्या नेत्यांविरोधात महाराष्ट्रात व भारतात कारवाई का होत नाही ? असा सवाल देखील निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने केंद्र सरकारला विचारला आहे. जयंत पाटलांच्या ईडी कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध नोंदवत असून हेतू पुरस्कार होणाऱ्या कारवाया थांबवण्याची देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पवार, जोसेफ मलबारी, जगन ताकटे, वाल्मीक मराठे, गोरख शर्मा , राजू चौधरी, महेंद्र शिरसाट, एजाज शेख, मनोज कोळेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध