Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य - विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य - विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे
मुंबई, दि. 22 : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.
राज्य शासनामार्फत जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना कशा प्रकारे लाभ दिला जातो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीची अर्ज प्रक्रिया, तसेच कोणत्या आजारासाठी कशा स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते, याबाबत या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी श्री. चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 23, बुधवार दि. 24 आणि गुरूवार दि. 25 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा