Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ मे, २०२३
शेळगावच्या मुस्कान सय्यद व ललिता वाघमारे तालुक्यातून सर्वप्रथम..
परंडा (राहूल शिंदे) दि.२६ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी फेब्रुवारी २०२३ परीक्षेचा ऑनलाईन निकाल गुरुवार रोजी जाहीर झाला. यामध्ये परंडा तालुक्यात कला शाखेतून प्रथम क्रमांक शेळगाव येथील माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी सय्यद मुस्कान सलीम व वाघमारे ललिता उमेश यांनी ८७.५० टक्के गुण घेऊन प्राप्त केला आहे.
शाळेतून बारावी परीक्षेला बसलेले ४७ पैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत ९७.८७ टक्के निकाल लागला, विद्यालय नेहमी गुणवत्ता राखत निकालाची परंपरा कायम ठेवत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थपक अध्यक्ष अँड. सुभाषराव मोरे,संस्था सचिव अमर मोरे, माजी. जि.प.सदस्या पुष्पाताई मोरे, माजी प्राचार्य संभाजी मोरे, सुधाकर खरसडे, परदेशी सर, प्राचार्य गुरुदास काळे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक-ग्रामस्थ आदींनी कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा