Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ मे, २०२३

बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले, नंदूरबार जिल्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कार्यवाही ' रु. 11.70 लाख किमतीचे बियाणे व वाहन जप्त



नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत दि.26 मे 2023 रोजी दुपारी 5: 00 वाजता जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्री. नरेंद्र पाडवी यांनी गुप्त माहितीच्या आधारे विनापरवाना कापूस बियाणे खाजगी वाहनाने येत असल्याचे समजले ,त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक श्री. नरेंद्र पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री नितेंद्र पानपाटील व तालुका कृषी अधिकारी श्री किशोर हडपे व कृषी अधिकारी श्री योगेश हिवराळे, श्री. अभय कौर यांनी सापडा रचून वाहन क्र. G.J .06. PC .3532 अडविली व विचारपूस केली असता वाहनचालक श्री. चंद्रकांत पांढुरंग माळी रा. कळंबु ता. शहादा जिल्हा नंदुरबार हा स्वतः वाहन चालवत असून विनापरवाना बियाणे जिल्हा बडोदा गुजरात राज्य येथून आणत असल्याचे कबुल केले. विभागीय कृषी सहसंचालक ,नासिक विभाग, नासिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , नंदुरबार श्री.तानाजी खर्डे व श्री प्रकाश खरमाळे, कृषी विकास अधिकारी,जि. प.नंदुरबार तसेच श्री संजय शेवाळे, तंत्र अधिकारी गुण नियंत्रण यांच्या मार्गदर्शन व परवानगीने पुढील कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे . सदरील वाहनात एकूण 17 पोते (867पाकिटे) अंदाजीय रक्कम रुपये 11.70 लाख चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.आरोपीवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६,बियाणे कायदा 1966, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा 2009, बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे .आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सारंगखेडा पोलीस स्टेशन ला सुरु आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध