Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर साक्री तालुक्याच्या आदिवासी बांधव श्री.डोंगरु बहिरम यांचे उपोषण सोडविले..
जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर साक्री तालुक्याच्या आदिवासी बांधव श्री.डोंगरु बहिरम यांचे उपोषण सोडविले..
साक्री तालुक्यातील बोदगाव येथील डोंगरु जिभाऊ बहिरम यांनी विविध मागण्यांसाठी धुळे शहरातील क्यूमाईन क्लब समोर गेल्या 1 मे पासून उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटना पक्षानी पाठिंबाही दिला होता, अखेर तीन दिवसानंतर बोदगाव येथील डोंगरु बहिरम यांच्या मागण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने आश्वासनाचे पत्र देऊन अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे उपोषण सोडविले आहे...
प्रत्येक शेतकरी खातेधारकाला केंद्र शासन व राज्य शासनाने खरीप हंगामासाठी 15 हजार रुपये व रब्बी हंगामासाठी 15 हजार रुपये द्यावे. व प्रत्येक खाजगी व्यापाऱ्याला हमीभावाप्रमाणे माल खरेदी करण्यास भाग पाडावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला हमीभाव द्यावा, पर्यावरणाचे संवर्धन टिकवण्याकरिता उपयोजना कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी डोंगर जिभाऊ बळीराम यांनी उपोषण सुरू केले होते.अखेर जिल्हा प्रशासनाने त्यांना आश्वासनाचे पत्र देऊन धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गृह शाखेचे उपचिटणीस दिपक पाटील यांनी उपोषण सोडविले आहे.यावेळी त्यांच्या समवेत इतर अधिकारी तसेच राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव श्रावण खैरनार, कॉम्रेड पोपटराव चौधरी, आदी यावेळी उपस्थित होते.....
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा