Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पो.स्टे च्या शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी...नटवाडे शिवारातील गांजाचे शेतावर मोठी कारवाई...
शिरपूर शहर पो.स्टे च्या शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी...नटवाडे शिवारातील गांजाचे शेतावर मोठी कारवाई...
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील नटवाडे शिवारातील गांजाचे शेतावर कारवाई करत
शिरपूर शहर पो.स्टे च्या शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी.केली आहे.शहर पोलिसांनी नटवाडे शिवारातील गांजाचे शेतावर कारवाई करुन एकूण ५,८६,६००/-रुपये किंमतीचा २९३.३०० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त करून कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
दि.०२/०५/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की. नटवाडे शिवारात इसम नामे हरचंद जोगी पावरा रा. नटवाडे ता. शिरपुर जि. धुळे याने त्याचे ताब्यातील वन जमीनीवरील शेतात गांजा (अंमली पदार्थ) ची लागवड करून बेकायदेशीररित्या शेती करीत आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांनी सदर बातमीची माहिती मा. पोलीस अधीक्षक,धुळे,मा.अपर पोलीस अधीक्षक,धुळे यांना कळवून छापा कारवाईची परवानगी घेऊन त्यानुसार छापा कारवाईकामी राजपत्रित अधिकारी श्री.रविंद्र कुमावत नायब तहसीलदार शिरपूर,दोन शासकीय पंच,वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच शिरपूर शहर पो स्टे चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं.३ वरील सुळे फाट्याचे.पुढे नटवाडे ता.शिरपूर जि.धुळे शिवारात जाऊन शोध घेऊन १९.५५ वाजेच्या सुमारास इसम नामे हरचंद जोगी पावरा रा. नटवाडे ता. शिरपूर जि.धुळे याचे वनजमिनीचे शेतात छापा टाकला असता त्या शेतात भुईमुंगाचे पिकात टिकटिकाणी गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतींच्या झाडांची लागवड करुन शेती केलेली दिसली.सदर इसम शेतात मिळून आला नाही.त्याचे शेतात मिळून आलेल्या एकूण ५,८६,६००/-रुपये किंमतीचे २९३.३०० किग्रॅ वजनाचे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीचे झाडे जप्त करुन त्याचे विरुद्ध पोहेकॉ / ६०३ ललित पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउप निरी.किरण बान्हे करीत असून सदर गुन्ह्यातील फरार आरोपीताचा शोध घेणे सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा