Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी.पथकाची कामगिरी..... दोन चोरट्यांकडुन एकुण २,८०,०००/- रू.किं.च्या सहा मो.सा.हस्तगत...
शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी.पथकाची कामगिरी..... दोन चोरट्यांकडुन एकुण २,८०,०००/- रू.किं.च्या सहा मो.सा.हस्तगत...
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर शहरात मोटर्स सायकल चोरीबाबत दाखल गुन्ह्यातील आरोपींच्या व मुद्देमालाच्या शोध घेण्यास शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय पथकास यश आले असून त्यांच्या तपासा दोन चोरट्यांकडून दोन लाख अंशी हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल हस्तगत करून गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.
शिरपूर शहर पो.स्टे. गुरु, १८४/२०२३ भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी हेमंत अनिल भोई वय-२९ व्यवसाय नाश्ता दुकान रा.आदर्श नगर, शिरपूर जि.धुळे यांनी फिर्याद दिली की, दि. २०/०२/२०२३ रोजी सायं. ५.३० ते रात्री १०.३० वाजेचे सुमारास शिरपुर जि.धुळे शहरातील खंडेराव महाराज मंदिराचे समोरील त्यावर त्यांनी त्यांचे मालकीची होंडा कंपनीची सी.बी. पुनिकॉर्न मो.सा. क्र.एम.एच.२८/ बी. एस. १९३० हि उभी केली असता तो कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराधाने चोरून नेलेबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे.
दापासाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर शिरपूर शहर पोस्ट यानी डीबी पथकाचे पोलीस अमलदार यांचे मार्फतीने तपासचक्रे वेगाने फिरवून डीबी पथकास २ संशयीत इसम नामे- १) संतोष विठ्ठल हटकर -३३ क्रांतीनगर, शिरपूर जि. धुळे व (२) रितेश सुरेशसिंग जमादार वय-३७ रा. सातपुर नाशिक क्रांती नगर शिरपूर जि. धुळे असे क्रांती नगर मध्ये सी.बी. यूनिकॉन मो.ना.बर तर फिरतांना मिळून आल्याने त्यांना विचारपूस करता त्यांनी सदरची मो.सा. खंडेराव महाराज मंदिराजवळून चोरी केल्याची कबुली दिली.त्यांनी आणखी इतर ठिकाणी चोरी केलेल्या एकुण ५. मो.सा.बस्नमूद इसम संतोष विठ्ठल हटकर याचे घराजवळ लावलेल्या मिळून आल्याने सदरच्या मो.सा.सह त्यांचेकडुन एकूण ६ मो.सा. जप्त करण्यात आल्या आहेत. दाखल गुन्हा मधील
१) होंडा कंपनीची सी. बी. युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच.१८/ बी. एस. १९३० चाबत शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. १८४/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
२) हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मो.सा. बाबत शिंदखेडा पो.स्टे. गुरनं. १०६/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे
चप्रमाणे २ गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगीरी करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात जप्त इतर मो.सा.बाबत गुन्हे दाखल आहेत अगर करने या अनुषंगाने तपास सुरु असून सदर गुन्याचा तपास पोनि ए.एस.आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे पोहेकॉ / लादूराम चौधरी करीत आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाल श्री. ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. या उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर. बी. पथकाचे पोहेकॉ ललीतपाटोल, लादूराम चोधरी, पोना/मनोज पाटील, पोका/विनोद आखडमल,गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार,प्रविण गोसावी,मनोज दाभाडे, सचिन बाघ,भटू साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार व राम भिल अशांनी मिळून केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा