Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ मे, २०२३

शासन आपल्या दारी कार्यक्रम घाई घाई घेण्याचा हेतू काय... मा. पंचायत समिती सदस्य माऊली याचा प्रशासनाला खडा सवाल



आज दिनांक 23 मे २०२३ रोजी मंगळवार ला सकाळी ठीक नऊ वाजता धनदाई देवी मंदिर परिसरात म्हसदी ता साक्री येथे असलेल्या आप्पाश्री मंगल कार्यालय मध्ये महसूल विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .उपस्थित असलेल्या जन माणसांमधून मात्र कार्यक्रमाविषयी ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियांची नोंद आणि दखल शासनाला घेणे क्रमप्राप्त आहे निदर्शनास आले. लोकांच्या त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने एक पंचायत समिती सदस्य म्हणून मा. पंचायत समिती सदस्य सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या प्रतिक्रिया शासनाच्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवणे हे मी माझे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य मानतो.त्यासाठी लोक काय म्हणतात हे आपण जाणून घेऊ . शासन आपल्या दरबारी आजचा कार्यक्रमाला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही.त्याची काही कारणे पुढील प्रमाणे.हा कार्यक्रम शासनाच्या वतीने घाई -घाईत घेण्याचा हेतू काय? लोकांमध्ये जाऊन जन माणसांचे प्रबोधन करणे प्रचार प्रसार करणे खेड्यापाड्यावर रिक्षा फिरविणे आणि या कार्यक्रमाची पूर्वकल्पना देणे व त्यातूनच जाहिरात बाजी करून लोकांमध्ये विविध शासनाच्या योजना विषयीची माहिती देणे क्रमप्राप्त होते परंतु गावात रिक्षाचा प्रचार सोडला तर म्हसदी परिसरातील गावाला लागून असलेल्या इतर कुठल्याही खेड्यावर या कार्यक्रमाची माहिती लोकांना देण्यात आलेली नव्हती. ही एक प्रकारे जनतेची दिशाभूलच आहे असे लोक बोलतांना दिसून येत होते.खऱ्या अर्थाने ज्यांच्यापर्यंत शोषित पिढीत दुर्बल घटक अपंग दिव्यांग गोरगरीब यांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती पोहोचवणे गरजेचे आहे परंतु त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही अशी ही खंत लोकांनी व्यक्त केली .मग कार्यक्रम घेऊन काय उपयोग झाला? कार्यक्रम घ्यायचाच होता तर याच्या आधी गावागावात जाऊन लोकांना त्याची व्यवस्थित माहिती देणे प्रचार प्रसार करणे हे महत्त्वाचे होते परंतु शासनाच्या व शासनाचे प्रतिनिधी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने नियोजनाचा पूर्णपणे अभाव दिसून आलेला आहे हे माझ्याही स्वतः लक्षात आले आहे. कारण ऐन वेळेस बऱ्याच लोकांपर्यंत कार्यक्रम काय आहे हे माहित नव्हते .परंतु शासनाने धावपळीत कार्यक्रम घेऊन जर शासनाचा हेतू सफल होत नसेल तर असा कार्यक्रम घेऊन काय उपयोग.म्हणून शासनाने योग्य तो निर्णय घेऊन हा कार्यक्रम दोन-तीन दिवस अगोदर नियोजनबद्ध करायला पाहिजे होता परंतु अचानक घाई घाईने शासनाने हा कार्यक्रम उरकून घेतला मुळात लोकांना शासन आपल्या दारी म्हणजे काय? हाच विषय तळागाळातील लोकांना कळालेला नाही .म्हणून परिसरातला कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला नाही हा अल्प प्रतिसाद मिळाला असून त्यामुळे शासनाला विनंती आहे की अगोदर पूर्णपणे आजूबाजूच्या तळागाळातील लोकांपर्यंत कार्यक्रमाविषयीची माहिती देऊण व त्याविषयी शासनाने जनजागृती करुण हा कार्यक्रम लावणे अपेक्षित होता परंतु नियोजनाचा अभाव असल्यामुळे सदर कार्यक्रमात लाभार्थ्यांपेक्षा व सामान्य जनतेपेक्षा विविध विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त दिसून येत होती त्यामुळे हा कार्यक्रम कर्मचाऱ्यांचा आहे की लोकांचा आहे हे उपस्थित असलेल्या लोकांना कोणालाही कळत नव्हते. म्हणून म्हसदी परिसरातला घाईघाईने ठेवलेला शासन आपल्या दारी हा अल्प प्रतिसाद मिळाला आहे हे नाईलाजाने वारंवार म्हणावे लागत आहे. शासनाच्या विविध योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत कशा पोहोचतील याची माहिती देण्यासाठीच शासनाने योग्य नियोजन करून हा कार्यक्रम ठेवला पाहिजे होता.म्हणून शासनाला व सौ आमदार मंजुळाताई गावित यांना विनंती आहे की हा कार्यक्रम पुन्हा म्हसदी परिसरात आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींना व तळागाळातील लाभार्थ्यांना हा काय कार्यक्रम आहे शासन आपल्या दारी ही काय भानगड आहे हे समजावणे महत्त्वाचे आहे . म्हणून मी शासनाला विनंती करतो की हा कार्यक्रम नवीन ठेवण्यात यावा व शासकीय कर्मचाऱ्यांनी याची दखल घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येक योजना कशी पोहोचेल याची माहिती देणे आवश्यक आहे परंतु कुठलीही माहिती न देता अचानकपणे व्हाट्सअप वर व इतर ठिकाणी बोलावून कार्यक्रम करणे चुकीचे आहे म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना विनंती आहे की हा कार्यक्रम नवीन पद्धतीने नियोजन करून पुन्हा घेण्यात यावा व शासनाच्या या कार्यक्रमाविषयी जो हेतू आहे तो सफल करण्यासाठी नव्याने नियोजन करून हा कार्यक्रम पुन्हा घेण्यात यावा ही आपणास मी एक लोकप्रतिनिधी म्हणून नम्र विनंती करीत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध