Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ मे, २०२३
शिरपूर शहरांत संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी होणार...
शिरपूर (प्रतिनिधी) येथील शिरपूर तालुका भोई समाज सेवा संस्था व श्री संत भिमा भोई उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ रोजी शहरातील खालचे गाव बालाजी मंदिराजवळ संत भिमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.आमदार अमरीशभाई पटेल हस्ते संत भिमा भोई यांचे प्रतिमा पूजन करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून आ.काशीराम पावरा,माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,माजी जि.प.अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे,जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,सुप्रसिध्द उद्योगपती चिंतनभाई पटेल,पटेल संकुलाचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर,विनोद सोनार आदी उपस्थित राहणार आहेत.
25 मे रोजी शहरातील खालचे गाव बालाजी मंदिर चौकात सायंकाळी ७ वाजता समारोह आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी श्री संत भिमा भोई उत्सव समितीने शहरात मिरवणूक न काढता एकाच ठिकाणी कार्यक्रम करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.त्यामुळे डीजे, बॅन्ड आणि ढोल- ताशांच्या गजरात संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु राहणार असून समाज बांधवांनी व नागरिकांनी यात सहभागी होण्याची आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा