Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० मे, २०२३
उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्ष सौ सुषमा वासुदेव देसले यांचे आवाहन....
अमळनेर प्रतिनिधी :- ग्रामविकासाच्या असंख्य अडीअडचणी असुन या बाबतीत धोरणात्मक बदल झाला नाही.अशा अनेक मागण्यांसाठी अखेर सरपंचांनाच रस्त्यावरउतरावे लागेल असा सज्जड दम सरपंच परीषदेच्या वतीने बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने या धडक मोर्चात आंदोलनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ सुषमा वासुदेव देसले यांनी केले आहे.
ग्रामविकासाच्या अडचणी लक्षात घेऊन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखालीसरपंच,उपसरपंचांना एसटी महामंडळाच्या बस प्रवास मोफत करावा, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरपंच व सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, सरपंचांना दरमहा सरसकट दहा हजार रुपये व उपसरपंच यांना तीन हजार रुपये तसेच सदस्यांनाही मानधन सुरू करावे तसेच अन्य मागण्यासाठी २२ मे रोजी कराड ते सातारा पदयात्रा आणि सातारा ते मुंबई भव्य मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.लोकप्रतिनिधी तसेच शासन व प्रशासन यांनी लोकप्रियतेसाठी शहराच्या उदात्तीकरणाला नेहमी प्राधान्य दिले. त्यामुळे ग्रामविकासाला खीळ बसली आहे.
सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचे अनेक मागण्या या पेंडिंग आहेत त्यांच्या मागण्या कोणत्याही प्रकारे शासन लक्ष देत नाही यासाठी सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांनी भव्य मोर्चामध्ये उपस्थित राहावे असे सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा सौ सुषमा वासुदेव देसले यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा