Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
समस्त भोई समाज धुळे शहर आयोजित संत शिरोमणी भीमा भोई जयंती उत्त्सव निमित्त समिती जाहीर
समस्त भोई समाज धुळे शहर आयोजित संत शिरोमणी भीमा भोई जयंती उत्त्सव निमित्त समिती जाहीर
भोई समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी भीमा भोई जयंती २५ मे रोजी येत असून संत भीमा भोई यांची जयंती धुळे शहरात मोठ्या उत्सवात साजरी करण्याचे ठरवण्यात आले, या निमित्ताने दि.१८ मे रोजी कानुश्री मंगल कार्यालयात संपूर्ण धुळे शहरातील भोई समाजातील प्रमूख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कृष्णा रामचंद्र फुलपगारे (फॉरेस्ट) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. व संपूर्ण धुळे शहरातील भोई समाज मिळून एकत्रित संत भीमा भोई जयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले, तसेच शहरातून भव्य दिव्य अशी संत भीमा भोई जयंती निमित्त सायंकाळी ५ वाजता मिरवणूक देखील काढण्याचे ठरवण्यात आले.
या बैठकीत आलेल्या सर्व मान्यवरांनी तसेच समाज बांधवांनी संत भीमा भोई जयंती उत्सव तसेच मिरवणूक काढण्यासंदर्भात कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात आपली मते व्यक्त केली शेवटी समस्त भोई समाज मिळून श्री गणेश बापू मोरे,कृष्णा रामचंद्र फुलपगारे तसेच आलेल्या सर्व मान्यवर व समाज बांधवांच्या मार्गदर्शनाखाली संत भीमा भोई जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली. याप्रसंगी धुळे शहरातील भोई समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समिती पुढील प्रमाणे.
अध्यक्ष :श्री नंदलाल फुलपगारे (माजी नगरसेवक)
कार्याध्यक्ष : श्री भिलेश भाऊ खेडकर
स्वागतध्यक्ष : श्री सुवालाल ढोले
उपाध्यक्ष : श्री. विश्वनाथ फुलपगारे
उपाध्यक्ष : श्री मयूर मोरे
उपाध्यक्ष: श्री किरण लालचंद फुलपगारे
उपाध्यक्ष: श्री हिरालाल अमृत मोरे सचिव : श्री विलास फुलपगारे
खजिनदार: आनंद संतोष फुलपगारे
संघटक: श्री शत्रुघ्न तावडे
संघटक: श्री रोहितभाऊ शिंगाणे
संघटक: भास्कर फुलपगारे
संघटक: प्रदीप जगन्नाथ फुलपगारे
संघटक : रवींद्र फुलपगारे (पिंटू)
प्रसिद्धीप्रमुख: मच्छिंद्र आप्पा फुलपगारे
सो.मीडिया प्रमुख: वीरेंद्र फुलपगारे
सदस्य पुढील प्रमाणे: विश्वनाथ ढोले, भरत फुलपगारे, राहुल वाडीले, बन्सीलाल वाडीले, नाना वाडीले, कैलास मोरे, विठोबा वाडीले, गणेश फुलपगारे, विजय फुलपगारे, प्रशांत फुलपगारे, बलराम फुलपगारे, भटू ढोले, महेंद्र फुलपगारे, विक्रम फुलपगारे, नरेंद्र फुलपगारे, वीरेंद्र ढोले, सचिन फुलपगारे, गणेश छगन फुलपगारे, योगेश मोरे इत्यादींची समितीत निवड करण्यात आली तसेच जयंती उत्सवासाठी भोई समाज बांधवांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील ना...
-
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा