Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ४ मे, २०२३
खरिप हंगामची तयारी अद्याप पूर्णपणे सुरु झाली नसतांना बनावट खतांचा भूत शेतकर्यांच्या मानगुटीवर बसले आहे.जळगाव व धुळे जिल्ह्यात बनावट पोटॅश खताची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.कृषी विभागाने सापळा रचत पोटॅश खताच्या ९६ हजार ९०० रुपयांच्या एकूण ५७ बॅग मुद्देमाल जप्त केल्याने बनावट खते विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गत हंगामातही बनावट खतांमुळे अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले होते.यामुळे यावेळी शेतकर्यांनी खते खरेदी करतांना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
चोपडा तालुक्यातील हातेड खुर्द येथील शेतकरी किशोर आत्माराम पाटील यांनी पोटॅश खते खरेदी केल्यानंतर ते बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले.याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली.त्यानंतर तालुका कृषी अधिकारी दीपक सांळुखे व अरुण तायडे यांनी या शेतकर्याकडे जाऊन पोटॅश या खताची बॅगची व त्यामधील खताची तपासणी केली असता त्यांना या खताबाबत बनावट असल्याचे प्रथमदर्शनी आढळले.त्यानंतर त्यांनी शेतकर्यास विचारले असता त्यांनी सांगितले,की मंगलचंद झुंबरलाल जैन (मु.पो.तोंदे,ता.शिरपूर) यांनी त्यांना या खताच्या ७ बॅग १ हजार ७०० रुपये दराने आणून दिल्या होत्या. या खताची पावती अथवा बिल दिले नव्हते. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने जैन यांच्या दुकानाच्या गोदामात छापा मारला असता त्या ठिकाणी म्युरीट ऑफ पोटॅश (एमओपी) या आयपीएल कंपनीच्या बनावट प्रति बॅग ५० किलो वजनाची खताच्या ५७ बॅग आढळून आल्यात.
हा खत साठा कैलास वासुदेव पाटील (रा.तोंदे) यांचा असल्याचा लेखी कबुली जबाब सुरजमल जैन यांनी दिला. त्यावरून कैलास वासुदेव पाटील यांनी सदरचे बनावट खत विक्रीसाठी आणले. कैलास पाटील यांना सुरजमल जैन यांच्या भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता हे खत किशोर शालिकराव पाटील (रा.करवंद) यांनी बिगर बिलाचे दिले असल्याचे सांगितले. यानुसार बनावट खताच्या ५७ बॅग प्रति बॅग ५० किलो वजनाची, प्रति बॅग किमंत १ हजार ७०० प्रमाणे मुद्देमाल ९६ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन करण्यात आला.
तोंदे गावात साठवणूक केलेले खत हे हातेड खुर्द (ता.चोपडा) येथील शेतकरी किशोर पाटील यांना देऊन फसवणूक केली.म्हणून मंगलचंद झुबंरलाल जैन (रा.तोंदे,ता.शिरपूर),कैलास वासुदेव पाटील (रा.तोंदे),किशोर शालिकराव पाटील (रा.करवंद,ता.शिरपूर) या आरोपींनी संगनमताने नकली खत शेतकर्यांना विक्रीसाठी आणल्याने शेतकर्याची व शासनाची फसवणूक केल्याने धुळे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे यांच्या फिर्यादी वरून थाळनेर (ता. शिरपूर) या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा