Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ मे, २०२३
बोरगांव ग्राम पंचायतीत अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण....
शिरपूर प्रतिनिधी : ग्रामपंचायत बोरगांव तर्फे गावातील महिला बचत गटातील समूह प्रमुख सौ वैशाली मनोहर पाटील व सौ निकिता मुकेश जोशी यांना सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या शुभहस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
शासन निर्णयानुसार या वर्षांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच दि. ३१ मे २०२३ रोजी प्रत्येक ग्राम पंचायतीने गावातील दोन कर्तबगार महिलांची निवड करून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार' देऊन गौरविण्यात यावे असे निर्देश शासनाने दिले होते.
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलिस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांची समिती गठीत करून गावातील महिलांची निवड करून पुरस्कार वितरित करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ही पुरस्कार योजना शासना तर्फे राबविण्यात येत आहे. दरवर्षी जयंतीदिनी महिला सन्मान पुरस्कार वितरित करण्याचे निर्देश महिला, बाल विकास विभागाने दिले आहेत.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ५०० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप शासनाने ठरवून दिले आहेत त्या नुसार ग्रामपंचायत बोरगाव येथील कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार वितरण प्रसंगी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी सैनिक दगेसिंग राजपूत, ग्रामसेवक पी बी सोनवणे, पोलीस पाटील मनोहर पाटील, विठ्ठल झुलाल कोळी, ग्रामपंचायत सदस्या विमलबाई दीपक राजपूत, पांडुरंग उत्तम कोळी, तानकु भिल, संजीव सजन पाटील, बापू भाईदास भिल, दीपक पदमसिंग राजपूत, रोहिदास कौतिक न्हावी, तेजेंद्र राजपूत, गोलू धुडकु भिल, संगणक परिचालक जितू राजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा