Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ जून, २०२३

साक्री तालुक्यातील कासारे येथे मोफत 220 रुग्णांची डोळे तपासणी 24 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,पारख परिवाराचा कौतुकास्पद सामाजिक उपक्रम.



साक्री तालुक्यातील कासारे येथील पारख परिवार व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 24 गोरगरीब,अपंग,शेतमजूर,गरजू,ज्येष्ठ नागरिकांची व दृष्टीहिनांची मोफत मोतीबिंदू शस्त्रकिया,भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,पारख परिवार कासारे व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रकिया शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते.या शिबिरात कांता लक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबारचे श्री अभिजीत खेडकर,नेतृतज्ञ डॉ.अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनानुसार नेत्रतज्ञ डॉ. गुणवंत कोळी यांनी 220 रुग्णांची मोफत डोळे तपासणी केली,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 24 रुग्णांची निवड करण्यात आली,त्या रुग्णांची नंदुरबार येथे मोफत मोतीबिंदूंचे ऑपरेशन करण्यासाठी गुरुवार दि.22/6/2023 रोजी पाठविण्यात येणार आहेत. मोतीबिंदूच्या रुग्णांना जाण्या - येण्याची सुविधा,चहा- नाश्ता,जेवण,लेन्स टाकून ऑपरेशन,औषधे,काळा चष्मा,ऑप्रेशन नंतर 7 दिवस, व 30 दिवसांनी तपासणी या सर्व सुविधा मोफत आहेत, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व शिबिराचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षण संचालक कासारेचे भूमिपुत्र भाऊसाहेब भालचंद्र दगाजी देसले होते,प्रमुख पाहुणे म्हणून निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले,सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक भाऊसो सुहास सोनवणे,साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारख, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब पंडित नाना पवार.मोहन देसले,आदी उपस्थित होते.सुरेश पारख यांनी प्रास्ताविक करुन शिबिरासंबंधी रुग्णांना सूचना दिल्यात,कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक भाऊसाहे बी.डी.देसले यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की पारख परिवाराचा गोरगरीब,दिव्यांग,वृद्ध,गरजू लोकांना अंधाराकडून - प्रकाशाकडे,दृष्टीहिनाना दृष्टी देण्याचे सामाजिक कार्य खूपच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.असे सांगून रुग्णांना शुभेच्छा दिल्यात. तसेच श्री विलास देसले यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की पारख परिवाराच्या या उपक्रमातून आत्तापर्यंत हजारो दृष्टीहिनांना दृष्टी देण्याचे कार्य,तसेच महाराष्ट्राचे शिक्षण संचालक भालचंद्र देसले यांनी आतापर्यंत हजारो शिक्षकांना अनमोल असे मार्गदर्शन करून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवून शिक्षण क्षेत्रात भरिव कार्य केले.हे दोघा जिवलग मित्रांचे कार्य खूपच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे सुहास सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले, मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आले, शिबिराचे आयोजक सुरेश पारख,सौ.मंगला पारख- योगशिक्षीका यांच्याकडून सर्वांना 21 जून,जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या,आणि योगा करा -निरोगी रहा, आपले आरोग्य निरोगी निरामय ठेवा, असा संदेश देण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्यात,मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. शिबिरास अनमोल सहकार्य -कासारे ग्रामपंचायत,साक्री तालुका प्रवासी महासंघ ,ग्राहक पंचायत महाराष्ट्र ,निसर्ग मित्र समिती,अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे मिळाले.कार्यक्रमाचे आयोजन सुरेश पारख व सौ.मंगला सुरेश पारख व पारख परिवार कासारे यांनी केले.

विनीत -- सुरेश पारख.कासारे
अध्यक्ष- साक्री तालुका प्रवासी महासंघ व शिबिराचे आयोजक.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध