Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ जून, २०२३

धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी जलज शर्मा



धुळे, दि. 21 : धुळे जिल्ह्यातील सद्यपरिस्थितीत लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बैठकीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतची आढावा
बैठक जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे,शिरपूर प्रांताधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, पोलीस अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.शर्मा म्हणाले,जिल्हयात कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाहीत.याबाबत पोलीस विभागाबरोबरच इतर विभागांनीही सजग रहावे. कुठेही सामाजिक तेढ निर्माण होईल असे बॅनर लावणे जाणार नाहीत याची दक्षता महानगरपालिका,नगरपालिका यांनी घ्यावी. नियमानुसार परवानगी घेतलेलेच बॅनर लावले जातील याची खात्री करावी.कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणा-यांवर कठोर कारवाई साठी पावले उचलावीत. तसेच अतिक्रमणाबाबतही नियमानुसार कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी केल्यात.
पोलीस अधिक्षक श्री.बारकुंड म्हणाले, आगामी येणारे आषाढी एकादशी व बकरी ईद आदि सणासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून काम केले पाहिजे.काही संशयास्पद आढळल्यास पोलीस प्रशासनास व महसूल विभागाकडे त्वरीत संपर्क साधावा. शहरात शांतता व सुव्यवस्थेबाबत पोलीस विभागाला सर्वानी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.अपर पोलिस अधीक्षक श्री. काळे यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली.तसेच महानगरपालिकेने शहरातील धार्मिक स्थळांबाबत पोलीस विभागाला माहिती देणे आवश्यक आहे.निवासी उप जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रास्ताविक केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध