Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० जून, २०२३

साक्री तालुक्यातील आ.मंजुळा गावित यांचा कडून वेहेरगाव येथे साठवण बांधारा साठी 32 कोटी मंजूर - आज कामाचे उदघाटन



साक्री प्रतिनिधी:- आज दिनांक 10/06/2023 रोजी मौजे वेहेरगाव तालुका साक्री येथे 32 कोटी रुपये मंजूर असलेले वेहेरगाव साठवण तलाव या कामाचे भूमिपूजन साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार माननीय मंजुळाताई गावित यांच्या शुभ असते करण्यात आले.या बंधारामुळे वेहेरगाव,भागापूर या परिसरातील 8-10 गावांना पाण्याचा फायदा होणार आहे. या कामासाठी विशेष प्रयत्न करून 32 कोटी मंजूर करून दिल्याबद्दल या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आणि सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने माननीय आमदार ताई यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळेस या परिसरातील तरुणांनी माननीय आमदार ताई यांना बाळूमामाच्या प्रतिमेची भेट देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री पोपटराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य सौ मंगलाताई भामरे, पंचायत समिती सदस्य श्री रवींद्र खैरनार ,माजी पंचायत समिती सदस्य अशोक तात्या मुजगे,श्री सचिन सोनवणे,मनोज देसले आणि परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध