Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ जून, २०२३

अंगणवाडी भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार, दोषींवर कारवाई करून प्रक्रिया नव्याने राबवा- शिवसेनेचा विभागीय उपायुक्त यांना तासभर घेराव



धुळे - धुळे शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडी मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेत एक हजाराच्या वर अर्ज महिला बालकल्याण विभाग यांच्या कङे सादर करण्यात आले होते.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांना गुणांकन शासना मार्फत परिपत्रका नुसार देण्यात आले होते, धुळे शहरातील महिला व बालकल्याण विभागातील  कर्मचाऱ्यांनी हे गुणांकन देतांना प्रचंड घोळ केला, या पदासाठी पात्र महिला उमेदवार चे आधी सिलेक्शन करण्यात आले, संबधित भरती प्रक्रियेत शासना मार्फत याच कार्यालयातील महीला कर्मचाऱ्यांवर भरती प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली, या कर्मचाऱ्यांकडून उमेदवारांकडून  लाखो रुपयांची मागणी मोबाईल द्वारे करण्यात आली या संदर्भात शिवसेना उ.बा.ठा.कङे असंख्य महिलांनी तक्रारी केल्या, शिवसेनेने महिना भरापुर्वी या कार्यालयात जावुन संबधीतांना जाब विचारला त्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांच्या कङे लेखी निवेदन देऊन भरती प्रक्रियेवर स्थगिती आणावी अशी मागणी केली, या संदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी विभागीय आयुक्त महिला बालकल्याण विभाग यांच्या कङे लेखी तक्रार दिली व संबंधित भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली, त्या तक्रारीची दखल घेऊन आज उपविभागीय आयुक्त नाशीक महिला बालकल्याण विभाग हे चौकशी साठी आले असता,अन्याय ग्रस्त महिला उमेदवार यांना सोबत घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील, ङाॅ.सुशील महाजन, भरत मोरे महिला आघाङीच्या संघटक हेमाताई हेमाङे, ङाॅ.जयश्री वानखेङे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय आयुक्त यांना तासभर घेराव घालून भरती प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार उघङकीस आणला, या संदर्भात उपविभागीय आयुक्त यांनी ज्या महिला उमेदवारांवर अन्याय झाला आहे त्यांनी आपले हरकतीचे अर्ज पुढील दोन दिवसांत कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले, व या सर्व उमेदवारांची 4,5,6 जुलै रोजी प्रत्यक्ष सुनावणी धुळे येथील कार्यालयात घेण्याची घोषणा केली, या भरती प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात शिवसेनेने महिला कर्मचारी सौ.चौधरी व सौ.पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्या बाबत लेखी तक्रार दिली यावर आयुक्तांनी संपुर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले, या संदर्भात शिवसेनेच्या वतीने ज्या महिलांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांनी पुढील दोन दिवसात हरकती दाखल कराव्यात असे आवाहन पत्रका द्वारे केले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध