Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २९ जून, २०२३

कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत मौजे मालपुर येथे शेतकरी महिलांचा सन्मान.



आज दिनांक 27 जून 2023 रोजी कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत मौजे मालपुर तालुका साक्री येथे मंडळ कृषी अधिकारी साक्री यांच्यावतीने महिला शेतकरी सन्मान दिन साजरा करण्यात आला यावेळी कृषी व कृषी संलग्न क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
सौ लक्ष्मी रतन काकुस्ते,लता भटू भामरे, लता सुभाष भामरे अंकिता जितेंद्र भामरे सुवर्णा अनिल भामरे,नीता भाम रे ,अलका चंद्रकांत भामरे, रेखा भामरे, रत्ना जाधव, गोकुळबाई भिकन भामरे, उषा संजय पाटील, उज्वला बच्छाव ,सुरेखा राजेंद्र बागुल, जयश्री सुभाष खैरनार मंदाकिनी ताई सोनवणे. उषा संजय सोनवणे,रूपाली शिंदे, सीमा अमित भामरे,पुष्पा गिरीष भामरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच ऊपस्थित सर्वच महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
मंडळ कृषी अधिकारी साक्री.श्री सुरेंद्रनाथ शिंदे यांनी पौष्टिक तृणधान्य विषयी महिला शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या आहारामध्ये तृणधान्यांचे महत्त्व सांगून तृणधान्य पिकांचे उत्पन्न वाढवण्या विषयी मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्रत्येक महिला शेतकर्यांना एक बाजरी व एक ज्वारी चे मिनी किट वाटप करण्यात आले
कृषी विभागाच्या विविध योजना जसे की स्वर्गीय .गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विषयी माहिती दिली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग यामध्ये पापड उद्योग,मसाला उद्योग,शेवया उद्योग, दाल मिल,असे विविध अन्न प्रक्रिया उद्योग आपण या योजनेमध्ये करू शकतो या योजनेला शासनाकडून पस्तीस टक्के अनुदान ऊपलब्ध आहे.म्हणून जास्तीत जास्त महिला शेतकरी भगिनींनी याचा लाभ घ्यावा.
 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग सलग लागवड व बांधावर लागवड याच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कृषी विभागाच्या सर्व योजनांबद्दल महिला शेतकरी भगिनींना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री योगेश सोनवणे उपस्थित होते.त्यांनी उपस्थित महिला शेतकरी भगिनींना त्यांचे शेतीमध्ये, घरामध्ये व समाजामधील महत्त्व या विषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली.
महिलांनी कृषी क्षेत्रामध्ये फक्त काम न करता नवीन तंत्रज्ञान ,नवीन योजना या आत्मसात केल्या पाहिजे. नवीन अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये भाग घेतला पाहिजे.
जर पुरुष शेतकऱ्यांच्या पाठीमागे त्याच्या घरचे महिला भगिनी खंबीरपणे उभ्या राहिल्या तर त्याची जोमाने प्रगती होते. अशाप्रकारे त्यांनी महिलांचे मनोधैर्य वाढवले.महिला शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून कृषि विभागाचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी चे संयोजन कृषि पर्यवेक्षक श्री.गोकुळ पवार,श्री अनिल बहिरम,कृषी सहाय्यक.श्री स्नेहल बोरसे,श्री जितेंद्र पगारे श्री.राजू बारसे,श्रीमती सीमा सोनवणे,श्रीमती जयश्री साळुंखे कृषी सहाय्यक यांनी केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध