Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ जून, २०२३
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ.हीना गावित यांचे कौतुक केले होते.हीना गावित यांनी आदिवासी समाजाच्या समस्या संसदेत मांडल्या होत्या.त्यांचे हे भाषण ऐकून आता मी काय बोलू,असा प्रश्न मला पडला आहे,अशा शब्दात मोदींनी गावित याचं कौतुक केलं होतं.
खासदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये हीना गावित यांनी संसदेत आपली छाप पाडली होती.पहिल्या टर्ममधील पाच वर्षात हीना गावित या सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या आघाडीच्या खासदारांपैकी एक होत्या.त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ खासदारांच्या बरोबरीने राज्याच्या समस्या संसदेत मांडून दाखवल्या होत्या.
पंतप्रधानांनी खासदार डॉ.गावित यांना पत्र पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.खासदार डॉ.हीना गावित यांना पंतप्रधानांनी पाठविलेले पत्र सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.मोदीजींचे प्रेरणा देणारे पत्रातील मजकूर असा......
हिना विजयकुमार गावितजी,
तुझ्या वाढदिवशी तुला माझ्या मनः
पूर्वक शुभेच्छा आणि शुभेच्छा.मी तुमच्या जीवनात शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.
भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी वाढदिवस हा एक खास प्रसंग आहे.
त्याचवेळी,हा दिवस कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य नव्या उत्साहाने पार पाडण्याची प्रेरणा देतो.येणाऱ्या काळात तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी नव्याने समर्पणाने झटत राहा. तुम्हाला उत्तम आरोग्याने भरलेले दीर्घायुष्य लाभो.मी पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो..
हार्दिक शुभेच्छा,
-नरेंद्र मोदी,पंतप्रधान
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा