Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० जून, २०२३

अवैद्य मद्य वाहतुकीवर पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त



धुळे पिंपळनेर अवैध मध्य वाहतूक करून गुजरात राज्यात विक्रीस जाण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोपनीय माहितीवरून पिंपळनेर पोलिसांनी धडक कारवाई करून देशी-विदेशी कंपनीच्या मध्य साठा व वाहन जप्त करून कारवाई केली आहे.
मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड सो, धुळे यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्यान अवैद्य धंदेबाबत तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समुळ उच्चाटन करणे बाबत विशेष सुचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने | पो.स्टे. हद्दीतील आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा सिमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग, नाकाबंदी लावण्यात येवुन तसेच गोपनीय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करण्यात येत होती.काल दिनांक 28/06/2023 रोजी रात्रीचे 1.30 वा. सुमारास आंतरराज्य सिमा भागात पेट्रोलींग सुरु असतांना सपोनि /श्रीकृष्ण पारधी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,अवेध रित्या दारूची तस्करी होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टापसह पेट्रोलींग करीत असताना पिंपळनेर ते नवापूर रोडवर काक शेवळ गावाचे अलीकडे नवापूर जाणारी एक पांढरा रंगाची होंडाई कंपनीची
i20 रोडवरील संशयीत वाहनास थांबविणेचा प्रयत्न केला असता सदर वाहनावरील  चालकाने काही अंतरावर वाहन थांबवुन जंगल परिसरात अंधाराचा फायदा घेवून जंगल परिसरात वाहन सोडुन पळून | गेला. सदर वाहनाजवळ जावुन पाहीले असता वाहन क्रंमाक एम एच 48 ए
सी 1525 असा असुन सदर वाहन | लॉक करुन पळाल्याचे दिसुन आले सदर वाहनात गोपनीय बातमी प्रमाणे अवैध मद्य साठा दिसून आला. सदर | वाहनाचे मागील सिटवर तसेच डिक्कीमध्ये देशी विदेशी कंपनीची दारू भरुन घेवुन जात असतांना निदर्शनास आले आहे सदर मद्यसाठा हा गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करुन घेऊन जात असले बाबत मिळून आले आहे. सदर मुददेमालाची व वाहनाचे वर्णन खालील प्रमाणे असा एकूण 8,63,862/-रु.एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील वाहन चालक याने अवैधरित्या मद्य वाहतुक करण्याचे उद्देशाने विदेशी मद्याचा नवापुर रोडवरील मळगाव शिवारातील कळंबारीत संशयीत वाहनास थांबविणचा प्रयत्न करून सदर वाहन हे काही अंतरावर चालकाने थांबवली व घनदाट जंगलभाग असून अंधार असल्याने त्यापरिस्थितीचा फायदा घेवुन वाहन लॉक करुन जंगल परिसरात पळुन गेला वाहनात मागील सिटावर व डिक्कोमध्ये मद्य भरुन वाहतुक करीत असतांना मिळुन आले.त्याबाबत पिपळनेर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारुबंदी अधि. कलम ६५ (अ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास
 अतुल पाटील करीत आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड सो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. साजन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी असई /लक्ष्मण गवळी, पो हे कॉ/कांतिलाल अहिरे,ओ साई अशोक पवार, रवींद्र सूर्यवंशी, अतुल पाटील,पंकज वाघ,राकेश बोरसे,दावल सेदाणे अशांचा सहभाग आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध