Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ जून, २०२३

नको आता ही रासायनिक शेती हवी पुन्हा नैसर्गिक शेती ....!!!



सध्या मागच्या 4 ते 5 दिवसांपासून डाळिंब प्लॉटसवर नवीन तेलकट डाग दिसून येत आहेत. त्यासाठी पी एम बायोटेकची ऑरगॅनिक उत्पादनाचा वापर करुन भविष्यात आपल्याला तेल्या सारख्या असाद्य रोगावर मात करणे शक्य आहे याच महत्त्वाचे कारण म्हणजे फुल अवस्थेतून झाड सेटिंग अवस्थेत गेले की आपल्याला प्लॉटमध्ये पाणी हे जवळपास 50% पेक्षा कमी करावे लागते परंतु काही शेतकऱ्यांनी वातावरण व आद्रता न बघता 4 ते 5 तास पाणी डाळिंब प्लॉटला देणे चालूच ठेवले आहे. सध्याच्या वातावरणात कमीत कमी पाणी प्लॉटला देणे गरजेचे आहे,डाळींबा वरील तेलकट डाग साठी पी एम बायोटेकचे ऑल राउंडर या जैविक औषधांचे 2 ते 3 फवारे करावेत म्हणजे या रोगावर आपल्याला नियंत्रण मिळविणे शक्य आहे वाफसा परिस्थिती लक्षात घेऊन किंवा वाफसा आल्यानंतर 24 तासांनी डाळिंब बागेला पाणी द्यावं.

इतर काही उपाययोजना :- 

1. मजुरांचा डाळिंब बागेतील आवागमन कमी करावे. 
2. खूप गरजेचे कामे असतील तरच बागेत मजुरांना प्रवेश द्यावा.
3. डाळिंब झाडांना इजा होईल असे कोणतेही काम जसे - छाटणी, फळं कमी करणे, झाड बांधणे, हिरव्या फुटा कमी करणे, मशागतीची काम, गवत कापणी इत्यादी काम करू नये. 
4. अत्यावश्यक असेल तरच फवारणी करणे ती ही पी एम बायोटेकचा परिपूर्ण ऑरगॅनिक औषधाची.
5. प्रतिजैविके या प्रकारच्या औषधांचा वापर करू नये. 
6. कॉपरयुक्त बुशीनाशकांचा किंवा बोर्डो मिश्रणाचा वापर सतत पाऊस पडत असेल तर त्या अवस्थेत करावा. 
7. पी एम बायोटेकचे सुडोमोनस, बॅसिलस यांचा वापर प्रत्येक 20 ते 25 दिवसांनी फवारणीतुन करावा. 
8. मागच्या 25 ते 30 दिवसांत जर जमिनीतून सुडोमोनस ,ट्रायकोडर्मा, पेसिलोमायसेस  तसेच मागच्या 30 ते 40 दिवसांत जमिनीतून पीएसबी, केएमबी व मायकोरायझा यांचा वापर झाला नसेल तर ते जमिनीतून द्यावं. 
9. जर वातावरणात आद्रता असेल तर अनावश्यक फवारणी किंवा ड्रीपने पाणी देऊन आद्रता जास्त वाढेल अशी सोय करू नये.
10. आठवड्यातून एकदा चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य 1 किलो , मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो व एसओपी 3 किलो/ एकर यांचा वापर जमिनीतून वाफसा अवस्थेत चालू ठेवावा.
11. इतर विद्राव्य खतांचा वापर पूर्णपणे थांबवावा व पी एम बायोटेकची बॅक्टेरिया वापराव्यात किंवा पान देठ परीक्षण करून त्यानुसार औषधाची फवारणी करावी. 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध