Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २८ जून, २०२३
पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याच्या चोरांचा प्रयत्न फसला...
शिरपूर (प्रतिनिधी) दि 27 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांकडून एस.बी.आयचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.एटीएम मशीन फुटत असल्याचे माहिती मुंबई येथील कार्यालयात कळताच त्यांनी तात्काळ शिरपूर तालुका पोलिस स्टेशन व गावातील नागरिकांना माहिती कळविल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
एटीएम मशीनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून चोरीचा प्रयत्न झाला असून चारचाकी वाहनातून चोर आल्याचे बाहेरील सिसिटीव्ही कॅमेरात दिसूनसिसिटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले आहे.एटीएम मशीन सोबत छेडछाड होत असल्याचे मुंबई कार्यालयाला सिग्नल मिळाल्याने मुंबई कार्यालयाने तात्काळ शिरपूर तालुका पोलीसांना संपर्क साधला.
एटीएम मशीन फोडण्यासाठी कटर सारख्या काहीतरी साहाय्याने कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलीस व नागरिकांना या घटनेबाबत माहिती मिळाल्याची चाहूल लागतात चोरट्यांनी तेथून पळ काढला.
संशयतांनी एटीएमच्या रुममध्ये प्रवेश करतांना हातात छत्री घेऊन त्याच्या साह्याने चेहरा लपवत असल्याचे एटीएम मशीन रुम समोरील बाहेरील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे.एटीएम मशीन सोबत छेडछाड होत असल्याचे मुंबई कार्यालयाला सिग्नल मिळाल्याने मुंबई कार्यालयाने तात्काळ शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
एटीएम मशीन फोडण्याची घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, संदिप पाटील,कैलास, योगेश मोरे, सुरेश ठाकूर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत भेट देऊन पाहणी केली पुढील तपास पोलीस दल करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा