Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३० जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर व तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने निवेदन. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावरील गोळीबाराचा शिरपूर मध्ये तीव्र निषेध...!
शिरपूर शहर व तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने निवेदन. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावरील गोळीबाराचा शिरपूर मध्ये तीव्र निषेध...!
शिरपूर प्रतिनिधी :-भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावरील गोळीबाराचा शिरपूर शहरात व शिरपूर तालुक्यातून मध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोशींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शासनाच्या वतीने योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी.भीम आर्मी संघटनेचे प्रमुख तसेच आझाद समाज पार्टी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद आज गोळीबार झाल्याचे धक्कदायक बाब समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेचा शिरपूर तालुक्यातील व शहरातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत असे नमूद केले आहे.
केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार यांच्याकडे वारंवार मागणी करूनही तसेच सुरक्षा व्यवस्थेची गरज असतांनाही चंद्रशेखर आझाद यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरविली न गेल्यामुळेच हा हल्ला घडला आहे. केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ चंद्रशेखर आझाद यांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था यावी, सदर घटनेची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग, (CBI) मार्फत चौकशी करण्यात मा. भाई चंद्रशेखर आझाद यांना केंद्र सरकारच्या वतीने विशेष झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात आम्ही करीत आहोत.
संपूर्ण देशभरामध्ये धार्मिक व जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले असून कट्टरवादी लोकांनी दलित नेतृत्वाला टार्गेट केले असल्यामुळे सर्वच दलित बहुजन नेतृत्वाला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी. याच बरोबर हल्लेखोरांच्या हातात बंदूक देणारा मेंदू कुणाचा होता. खरतर हे सुध्दा समोर येणे गरजेच आहे. कुणाच्या इशाऱ्यावर त्यांनी हे कृत्य केलं याचा छडा लागला पाहीजे. या घटनेनंतर आंबेडकरी जनता दुष्कृत्य करणया समाजविघातक शक्तींचा कुहेतूला कधीच बळी पडणार नाही. सामाजिक सलोखा, शांतता, एकजुटता आम्ही अबाधित ठेवू.आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहीजे.अशी मागणी आम्ही तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आपल्या समक्ष करीत आहोत. अशा आशयाचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी शिरपूर व शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
सदरच्या निवेदनावर पीएम देवरे अशोक ढिवरे प्रताप सरदार, गणेश सावळे, पिंटू शिरसाट, बी.एस.शिरसाट, राजू पवार,बी.एस .इंदासे, दिनेश पाटोळे ,अजय मंगळे, योगेश शिरसाठ, प्रकाश कडरे ,सिद्धार्थ थोरात ,भूषण थोरात, विशाल शिरसाट ,सिद्धार्थ कडवे ,रमेश वानखडे, गोविंदा थोरात ,विक्रम मरसोडे, अनिल खैरनार,जगदेव थोरात ,एडवोकेट युवराज ठोंबरे, मूलचंद शिरसाट ,गौतम मोरे ,विलास पाटोळे, सुशील सोनवणे ,ईश्वर अहिरे, या सहज शेकडो शिरपूर शहरातील व तालुक्यातील समाज बांधवांनी सह्या केल्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा