Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० जून, २०२३

शेतकऱ्यांच्या बँकेतील कर्मचारी करतात छुपा सावकारी व्यवसाय... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाने शाखाधिकाऱ्यांनी केलेत व्यवहार



शिरपूर प्रतिनिधी:- जिल्ह्यातील एका नामांकित बँकेचे शिरपूर तालुक्यातील कर्मचारी छुपा सावकारी व्यवसाय करत असल्याबाबतची कुजबुज आमच्यापर्यंत पोहोचली.मात्र त्यातली संपूर्ण माहिती अजून उघड झालेली नाही.तरी प्राप्त माहितीनुसार शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेतील अधिकाऱ्यांनी बचत गटांच्या नावावर कर्जाच्या रकम उचल करून शेतकऱ्यांना शेती कर्जाचे पुरवठा करणारी सहकारी संस्थांच्या शेतकरी सभासदांच्या नावाचे कर्जाचे भरणे माहे मार्च मध्ये केले आहेत.


तर पुढील एप्रिल ते जून महिन्यात लागलीच याच सभासदांच्या कर्ज मागणी याद्या मंजूर करून,मंजूर कर्ज रकमेतून मासिक चार रुपये शेकडा दराने व्याजाची रक्कम कपात करून व्यवहार केलेले आहेत.यामध्ये खरे बघितले तर या बँकेने सभासदांना एटीएम कार्ड दिलेले आहेत,मग खरोखर या सभासदांनी एटीएम मार्फत पैसे काढलेत का ? एखाद्या बँक अधिकाऱ्याने अथवा कर्मचारीने ? यासाठी ज्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यात आले तेथील सीसीटीव्ही फुटेज मागवून यातील खरा पुरावा मिळू शकेल. इतकेच नव्हे तर याच बचत गटामधून सभासद नसलेल्या त्रयस्त व्यक्तींना,महिलांना तसेच त्याच बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या भावांना, बहिणींना,बायकांना हे सभासद नसताना देखील त्यांना चार ते पाच रुपये मासिक शेकड्याने पैसे दिलेल्या असल्याची माहितीची कुजबुज आमच्यापर्यंत पोहोचले असून या बचत गटांवर मागील जवळपास पाच ते सहा वर्षांपासून असे व्यवहार सुरू असल्याची कानो कान खबर देखील मिळालेली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती प्राप्त केल्यानंतर सविस्तर वृत्त नावासह स्पष्ट करण्यात येईल.मात्र बिना परवाना व बँकेच्या परवानावर खाजगी सावकारी करणारे व शेतकऱ्यांना लुटणारे बँक अधिकाऱ्यांना ही बँक वटणीवर आणण्यासाठी यांच्यावर गुन्हे दाखल करेल का ? याकडे आता सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे.

आमच्या तरुण गर्जना वृत्तपत्रामार्फत याबाबत विभागीय सहनिबंधक नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे चौकशी करून बिना परवाना सावकारी करणारे व आपल्या पदाचा गैरवापर करून बँकेचा पैसा सावकारीसाठी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांचे नावे उघड होण्याबाबत पाठपुरावा नक्कीच केला जाणार आहे.

(वाचा सविस्तर पुढील अंकात...)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध