Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जून, २०२३

उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कैवारी बिंदू शेठ शर्मा यांचा शेतकऱ्यांकडून बळीराजा भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान



सविस्तर असे की.आज अत्यंत आर्थिक परिस्थितीमध्ये ग्रासलेल्या शेतकरी सुमनबाई नानाजी भामरे राहणार आवटी,यांची व्यथा..त्यांनी एन डी सी सी बँक कडून कर्ज घेतले असता दोघ भावांनी कर्ज फेडण्याची मोठी ताकद व उमेद होती परंतु त्याच काळात मोठ्या मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे ते कुटुंब पूर्णपणे हातबल झाले.. कुटुंबातील करता मोठा मुलगा गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब हे निराशेच्याग्रतेत गेले होते,त्यातही त्यांचा लहान मुलगा आणि याने मोठ्या मनाने आपले कुटुंब कसं बस सावरण्यासाठी प्रयत्न केले परंतु आज त्या कुटुंबावर एनडीसीसी बँक यांचे सर्वच अधिकारी तिथे जाऊन कर्जाच्या मागणीसाठी तगादा लावू लागले त्या कुटुंबाला खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अक्षरशः त्या कुटुंबाने आपली जमीन विकून एनडीसीसी बँक यांना चार लाख रुपये भरून दिले.त्यांच्या कुटुंबाला हा खूप मोठा आघात होता परंतु याच्यावर मलई खाणारे सुद्धा खूप होते...हे मात्र नक्की तसेच त्यांना दुसरा अनुभव बँक ऑफ महाराष्ट्र विरगाव शाखेमध्ये आला तेथील बँक मॅनेजर यांना विनंती केली असता की आम्ही 2018 मध्ये 70000 रुपये कर्ज घेतले असता, आज रोजी त्यांची व्याजासह किती रक्कम झाली.एक लाख 17000 हजार रुपये झाली होती परंतु...तेथील अधिकारी यांना विचारले असता की साहेब तुम्ही हे आमचं कर्ज ओटीएस मध्ये बसून आम्हाला न्याय द्यावा, त्यावेळी त्यांनी ना ओटीएस लिस्ट असलेली प्रिंट दिली, आम्ही बोलत असताना तेथील स्थानिक कर्मचारी यांनी त्यांना एका बाजूला बोलून सांगितले की यांची जमीन विकली आहे हे पूर्णपणे पैसे भरतील म्हणून संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की तुम्ही ओटीएस मध्ये बसू शकत नाही..तुम्हाला संपूर्ण पेमेंट भरावे लागेल शेवटी आम्हाला कोणताच पर्याय नसताना म्हणून शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली असता,खरोखरच त्या माणसाने आम्हाला स्वतः घरी बोलवून लगेचच त्यांनी आपल्या मोबाईल द्वारे संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून कळवले की सुमनबाई नानाजी भामरे राहणार आवटी या नावाने कर्ज घेतलेले असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना आपण काय न्याय देऊ शकतो अशा आशयाचे बोलणे केले तेवढे चेक करून काय होतं तेवढी मला ती माहिती द्या अवघ्या दहा मिनिटांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा कॉल आला आणि सांगितले फक्त ७१५९० रुपये रुपये भरा आणि आपले कर्ज नील करून घ्या.एवढी प्रचंड ऊर्जा शक्ती असलेल्या अशा बिंदू शेठ शर्मा यांचा कौतुक करावं तेवढं कमी..परंतु आम्हीच नाही तर अनेक शेतकरी तिथे बसून होते त्यांचे वेगवेगळे काम होती कोणाची डीपी असेल कोणाची पोल असेल कोणाचे वेगवेगळे कामे घेऊन शेतकरी बसलेले होते घरात बसून ते सतत त्यांचा मोबाईल चालूच होता नुसतं फोनवर बोलत नव्हते तर ते काम मार्गी सुद्धा लावत होते त्यांच्या घराच्या बाहेर जर आपण चप्पल बघितल्या तर चप्पल काढण्यासाठी ही जागा नव्हती.. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे ज्याच्या घरी चप्पल जास्त तोच खरा श्रीमंत हे तंतोतंत उदाहरण बिंदू शेठ यांच्या इथे दिसून आले अनेक दिवसांमधून बागलाण तालुक्यामध्ये अनेक शेतकरी विषय काम असतील तर नक्कीच बिंदू शेठ शर्मा यांना सांगितले जाते व हक्काचे नाव घेतले जाते अत्यंत आक्रमक व प्रचंड मेहनती असा हा व्यक्तिमत्व लोकांचे कामच नाही तर काम होईपर्यंत पाठपुरावा करताना आम्हालाही दिसून आले,
शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ एका गावासाठी इलेक्ट्रिक पोल नव्हते म्हणून त्यांनी एका गावाचा विचार न करता संपूर्ण तालुक्याचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन 170 पोल आमच्यासमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देण्याचे कबूल केले काय गरज असेल या माणसाला ना आमदार ना खासदार ना जिल्हा परिषद सदस्य, फक्त काम करण्याची जिद्द असले की सर्व काही शक्य होते हेच त्यांच्याकडे बघून दिसून येते.परंतु आपल्या शेतकरी बांधवांविषयी असलेलं प्रेम हे त्यांच्याबाबत दिसून येते कुणाचंही काम असो किंवा काहीही असो बिंदू शेठ शर्मा यांचा फोन लागलाच पाहिजे कधीही त्यांचा मोबाईल बंद नसतो व आपण सांगितले काम पूर्णपणे समजून त्याच्यावर उपाय ते नक्कीच काडत असतात अशा समाजपयोगी शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांचं निस्वार्थपणे चालू असलेले कामामधून स्वार्थ कधीच दिसून येत नाही.म्हणूनच शेतकरी बांधवांचाही बिंदू शेठ शर्मा यांच्यावर विश्वास आहे एवढच बोलतो आणि थांबतो.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध