Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ जून, २०२३

अवैध सुगंधीत सुपारी वाहतूक करणाऱ्यांना वाहनासह आरोपीला नरडाणा पोलीसांनी केले गजाआड



धुळे दि. २३/०६/२०२३ रोजी मा. सुरेश शिरसाठ,स.पो.निरीक्षक,नरडाणा पो.स्टे. यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, इंदौर कडून नरडाणा मार्गे आयसर क्र.MP.१३ CB. २४३३ हीच्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली स्वीट सुपारी घेवून जात असल्याची बातमी मिळाल्याने मा.सुरेश शिरसाठ व पोहेकॉ/४८५ सचिन माळी असे शासकीय वाहनाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ शिरपूर कडून धुळे कडे जाणाऱ्या रोडालगत असलेल्या आकांक्षा हॉटेल जवळ येवून वरील वाहनाची वाट पाहत थांबलो असता थोडया वेळात आयसर क्र.MP.१३ CB. २४३३ ही आल्याने तिस थांबण्याचा इशारा दिला परंतू सदर वाहना वरील चालक न थांबता आयसर पळवून घेवून जावू लागल्याने आम्ही सदर आयसराचा शासकीय वाहनाने पाठलाग करून तीस गोराणे फाटा येथे सायंकाळी ०५:३० वा. सुमारास थांबवून चालक यास विचारपूस करता तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदर आयसर ताब्यात घेवून नरडाणा पो.स्टे. येथे आणले व चालक यास त्याचे नाव विचारता १) महेंद्र रामू दावल वय २७ व्यवसाय चालक रा. मलतार ता. कसरावद जि. खरगोन (म.प्र.), २) हरीष जगदिश मडलोय वय २१ व्यवसाय क्लीनर रा. डाबरी पोस्टे मलतार ता. कसरावद जि. खरगोन (म.प्र.) असे असल्याचे सांगितले. परंतू वेळ झाल्याने व लेबर (मजूर न मिळाल्याने दि. २४/०६/२०२३ रोजी मजूरांकडून सदर आयसर मधिल माल खाली उतरवून पाहणी केली असता खाली प्रमाणे महाराष्ट्रात प्रतिबंधीत स्वीट सुपारी मिळून आली ती.
१. ३६०००० रु. की. चे ऑटी रोज स्वीट सुपारी यांच्या एकूण २५ गोण्या एका गोणीत ६ पिशव्या प्रत्येक पिशवीत ४० पाकिट व प्रत्येक पाकीट मध्ये ६० पाऊच प्रत्येकी १ रु. किंमतीची
२. २८८००० रु. की. चे आँटी नंबर वन स्वीट सुपारी यांच्या एकूण २० गोण्या गोण्या एका गोणीत ६ पिशव्या प्रत्येक पिशवीत ४० पाकिट व प्रत्येक पाकीट मध्ये ६० पाऊच प्रत्येकी १ रु. किंमतीची
३. १०,००,०००
रु. कि. आयसर क्र. MP.१३ CB. २४३३ जु.वा.की.अं.
१६,४८,०००/- एकूण किंमत
सदरची कारवाई ही मा.संजय बारकुंड सो., पोलीस अधीक्षक, धुळे, मा. किशोर काळे सो., अपर पोलीस अधीक्षक, धुळे, मा. सचिन हिरे सो., उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, यांचे मार्गदर्शना खाली सपोनि. सुरेश शिरसाठ, पोसई. मनोज कुवर, पोसई. रामनाथ दिवे, पोहेकॉ / ४८५ सचिन माळी, पोहेकाँ/२२ अहिरे, पोहेकॉ / १२३६ साळूंखे, पोहेकॉ /९८१ अकिल पठाण, पोना/१३५९ भरत चव्हाण, पोकाँ/१९४१ गजेंद्र पावरा, पोकों/ ४७३ खांडेकर, पोकाँ/१४८८ विजय माळी यांनी केली असून मा. किशोर बाविस्कर, अन्न प्रशासन विभाग यांचे मार्फतीने गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध