Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३० जून, २०२३

धुळे जिल्हयासह इतर जिल्हयात व राज्यात बनावट दारु तयार करुन विक्री करणारा फरार आरोपी दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिनु डॉन यास धुळे तालुका पोलीसांनी जेरबंद केले



दि. ०४.१२.२०२२ रोजी धुळे तालुका पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून ट्रक क्र. MH.४१ A.U.२१२४ या वाहनामध्ये अवैधरित्या बनावट दारुची वाहतुक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोनि श्री. दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने मा. पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली सदर ट्रकवर कारवाई केली असता सदर वाहनात रॉकेट देशी संत्रा नांव असलेली दारू मिळुन आल्याने एकुण ९५,७७,८००/- ( पंच्याण्ण्व लाख,सत्याहत्तर हजार आठशे रुपये) किमतीचा मुददेमाल आणि बनावट दारू तयार करण्याची साधने पोलीसांनी जप्त केली होती.त्यामुळे धुळे तालुका पोलीस ठाणे येथे न.६९९/२०२२ भा.द.वि. ३२८,४८२,४८३,३४ सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ), (ब), (क),(ङ),(ई), (फ) प्रमाणे गुन्हा न करण्यात आला होता. तसेच सदर गुन्हयात सुमारे १० आरोपीतांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले होते.पकी सदर गुन्हयात ०९ आरोपीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. तसेच नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे दिनेश अनवा गायकवाड ऊर्फ दिन डॉन,रा.शिरुड, ता.जि.धुळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
पोनि श्री.दत्तात्रय शिंदे यांनी त्यांचे तांत्रिक कौशल्याचा व गोपनीयन माहितीचा वापर करून धुळे तालुका पोलीस ठाणेच्या तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अनिल सुभाष महाजन, पोहेकॉ ३०३ प्रविण सदाशिव पाटील,पोना १२८८ उमेश पवार, पोना ६४९ कुणाल पानपाटील यांचे पथकास वेळोवेळी तांत्रिक माहिती देवून सदर पथकाचे मदतीने नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिन डॉन रा.शिरुड,ता.जि.धुळे याचा शोध सुरु ठेवला होता. तसेच सदर आरोपीत हा पुन्हा पुन्हा मोबाईल सीमकार्ड व मोबाईल बदलत असल्याने आणि त्याचा ठावठिकाणा नेपाळ, गोवा,उत्तरप्रदेश व बिहार आशा ठिकाणी थांबुन सतत बदलत असल्याने तो मिळुन येत नव्हता. तेव्हा पोनि दत्तात्रय शिंदे यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे वर नमुद पथकासह तांत्रिक तपासाचे आधारे सदर आरोपी हा दि.२८.०६.२०२३ रोजी गंगाखेड, जि.परभणी येथे असल्याचे तांत्रिक तपासात समजल्याने सदर आरोपीतास गंगाखेड शहरातील बस स्टॅन्ड जवळील जगदंबा हॉटेल जवळ जि.परभणी येथून दि. २९.०६.२०२३ रोजी त्यास ताब्यात घेतले व त्यास धुळे तालुका पोलीस स्टेशनला आणुन नमुद गुन्हयात दि. २९.०६.२०२३ रोजी अटक केली आहे.
अशा प्रकारे नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे दिनेश निवा गायकवाड ऊर्फ दिनु डॉन रा. शिरुड,ता.जि.धुळे यांचेकडे सखोल विचारपुस केली असता तसेच त्याचा अभिलेखाबाबत माहिती घेतली असता सदर आरोपीताविरुध्द धुळे जिल्हयात तसेच राज्यात व इतर जिल्हयात देखील गंभीर स्वरुपांचे गुन्हे दाखल असल्याचे समजले असुन काही गुन्हयांमध्ये तो अदयाप फरार असल्याने धुळे तालुका पोलीसांनी आरोपी नामे दिनेश निबा गायकवाड ऊर्फ दिन डॉन रा.शिरुड, ता.जि.धुळे यास अटक केल्याने त्यामुळे त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक श्री. संजयजी बारकुंड साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोरजी काळे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामिण विभाग साक्री श्री.साजन सोनवणे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे यांनी त्यांचे तांत्रिक कौशल्याचा व गोपनीयन माहितीचा वापर करून धुळे तालुका पोलीस ठाणेच्या तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अनिल सुभाष महाजन,पोहेकॉ ३०३ प्रविण सदाशिव पाटील,पोना १२८८ उमेश पवार,पोना ६४९ कुणाल पानपाटील यांचेसह नमुद गुन्हयातील फरार आरोपी दिनेश निबा गायकवाड ऊर्फ दिनु डॉन रा.शिरुड ता. जि. धुळे यास ताब्यात घेवून अटक केली आहे. सदर कार्यवाहीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध