Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० जून, २०२३

धुळ्यात मंदिर विटंबना प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून विराट मोर्चाचे आयोजन......!! जय श्रीराम चे नारे देत उसळला भगवा जनसागर...!!



धुळे प्रतिनिधी :- धुळे येथील राम मंदिर विटंबना च्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून धुळे बंदची हाक देत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले.आग्रा रोड वरील छत्रपती शिवराय व प्रभू श्रीराम यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.जय श्रीराम चे नारे देत धुळ्यात भगवा जनसागर उसळल्याचे दिसून आले. व्यापारी बांधवांसह धुळेकर नागरिकांनी देखील आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत मोर्चात सहभागी झाले होते. सियावर रामचंद्र की जय,जय श्रीराम छत्रपती शिवरायांचा विजय असो आधी घोषणांनी आग्रा रोड चा परिसर चांगलाच दणाणून गेला होता. नियोजनबद्द रित्या आग्रा रोड हून निघालेला या मोर्चाचा समारोप शिवतीर्थ येथे करण्यात आला.विटंबना झालेल्या मंदिरात प्रभू श्रीराम लक्ष्मण जानकी यांच्या नवीन स्थापन होणाऱ्या मुर्त्यांची देखील या मोर्चा च्या माध्यमातून पुष्पृष्टी करत मिरवणूक काढण्यात आली.एकंदरीतच निघालेला या मोर्चामुळे धुळ्यातील वातावरण भगवेमय झाल्याचे दिसून आले.  

मोर्चातील या प्रमुख मागण्या मंदिर विटंबना प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन त्यामागील सूत्रदाराला कडक शासन करण्यासह बेकायदेशीर टिपू सुलतान स्मारक प्रकरणी शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा,तसेच लव जिहाद विरोधी व धर्मांतर बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून निजामपूर येथील पोलीस भगिनीचा छळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून तिला संरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आल्या आहे. 

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आग्रा रोड वरून निघालेल्या मोर्चाला पोलीस प्रशासनाचा कडे कोट असा बंदोबस्त पाहण्यास मिळाला.संवेदनशील ठिकाणांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील होते.तर जिल्हा पोलीस अधीक्षकांचा देखील या मोर्चावर करडी नजर होती. यात उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पश्चिम देवपूर चे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, आझाद नगरचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील,चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांच्या सह मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

सामाजिक कार्यकर्त्यांकडून पेयजल चे वाटप रणरणत्या उन्हात प्रभू श्रीरामांच्या सन्मानासाठी निघालेल्या मोर्चा असंख्य हिंदू बांधव सहभागी झाले होते.भर उन्हात निघालेल्या या मोर्चातील बांधवांसाठी शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाच कंदील परिसरात पेय जल चे वाटप करण्यात आले.सामाजिक कार्यकर्त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे मोर्चातील बांधवांनी कौतुक केले आहे. 
हिंदुत्ववादी संघटनांसह सर्व पक्षिय नेत्यांचा मोर्चात सहभाग प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे झालेल्या विटंबनाच्या निषेधार्थ धुळ्यात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या विराट मोर्चा त हिंदुत्ववादी संघटनांसह भाजप, शिवसेना, उबाठा सेना, यांसह विविध पक्षाचे नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.   

याप्रसंगी खा.सुभाष भामरे,भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,माजी महापौर चंद्रकांत सोनार,प्रदीप करपे, माजी नगरसेवक भिकन वराडे, नगरसेवक हिरामण गवळी,सुनील बैसाणे,राजेंद्र महाराज मराठे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे,सतीश महाले, उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे,महेश मिस्तरी,महानगर प्रमुख धीरज पाटील,चेतन मंडोरे,कमलाकर अहिरराव,धीरज परदेशी,विकी परदेशी, राकेश कुलेवार,गणेश मोरे,जयेश मगर, यांच्यासह पदाधिकारी व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध