Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जुलै, २०२३

पी.एम.बायोटेकचा विविध जैविक खते व सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते व उत्पादनात भरघोस वाढ होते



पूर्वी ऊस पिकाला खते देत असताना फक्त रासायनिक खते देत होतो.नंतरच्या काळात  सूक्ष्म अन्नद्रव्या साठी 10 किलोची बॅग वापरू लागलो.त्यामध्ये झिंक ,फेरस,
मैग्नेशियम, मैग्निज,बोरॉन,कॉपर,मॉलीबडेनम हे सर्व 10 किलोच्या बॅग मध्ये मिळायचे.जमिनी मध्ये ताकत होती त्यामुळे 10 किलो च्या बॅग मधून त्याची गरज भागायची. परंतु  त्यानंतर सातत्याने न थांबता ऊस काढून ऊस करत गेल्यामुळे  अलीकडील काळात 10 किलो च्या बॅगमधील सूक्ष्मअन्नद्रवे ऊस पिकाला कमी पडू लागले.त्यामुळे खास ऊस पिकासाठी बनवलेले 53 किलोची कॉम्बिपॅक वापरायला सुरुवात केली. तेव्हापासून सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता दिसत नाही.सुक्ष्मअन्नद्रवे शेणखता मधून दिल्याने चिलेटेड स्वरूप प्राप्त होऊन ते  पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात.त्यासाठी एकरी 250किलो चाळून घेतलेले शेणखत किंवा कोणत्याही सेंद्रिय खतामधून दिल्यास सुंदर परिणाम मिळतात.  
चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्मअन्नद्रवे  देखील वापरू शकता.विशेषत चुनखडीयुक्त जमिनी मध्ये,भारी निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये चिलेटेड सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर परिणामकारक ठरतात.  चिलेशन केल्यामुळे पिकांना सहज व जलदरित्या उपलब्ध होते व जमिनीत कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही. चिलेटस ही पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असतात किंवा पूर्णपणे विरघळतात. चिलेट स्वरूपातील खतांची कार्यक्षमता जास्त असल्याने  वापराचे प्रमाण कमी लागते.
सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर करत असताना शक्यतो रासायनिक खता ऐवजी पी एम बायोटेक काला हे खत एकरी 100 किलो द्यावे .दोन्ही मध्ये किमान 15 दिवसाचे अंतर ठेवा. पर्याय नसल्यास काकरीच्या एका बाजूला रासायनिक खत व दुसऱ्या बाजूला सुक्ष्मअन्नद्रवे टाका. विशेषतः खोडव्याला सुरुवातीला रासायनिक खताबरोबर सूक्ष्मअन्नद्रवे देण्याची गरज भासते.अशा कंडिशनला एका बाजूला रासायनिक खते व दुसऱ्या बाजूला सूक्ष्मअन्नद्रवे टाकावे. परंतु काही शेतकरी रासायनिक खता ऐवजी पी एम बायोटेकचे एन पी के व बायो पोटॅश,बायो सम्राट इत्यादी प्रकारची सेंद्रिय खते व सूक्ष्मअन्नद्रव्ये मिसळून टाकतात,ते सर्व टाकावे .    

एकरी खालील प्रमाणे सूक्ष्मअन्नद्रव्ये द्या.

पी एम बायोटेकचे झिंक 10 किलो  मॅग्नेशियमसल्फेट :-10 किलो
फेरस सल्फेट:-10 किलो
मैग्नेशियम सल्फेट:-25 किलो
मैग्निज सल्फेट :-5किलो
बोरॉन :-3किलो 
 गंधक :- 10किलो
 सिलिकॉन पावडर:- 80 किलो

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध