Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ जुलै, २०२३

शिरपूर तालुक्यातील तोंदे वि.का.सोसायटीचे फ़ेरलेखापरिक्षण प्रकरण व त्यामागील सत्य...!



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्याती तोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या फेरलेखापरीक्षकाने मटनाबरोबरच चांगला सुजेपर्यत मनसोक्त मार खाल्याचे आपण मागील अंकात वाचलेच आहे.तसेच सदर घटनेच्यावेळी हजर असलेले फेरलेखापरीक्षकाचे सहकारी कर्मचारी हे देखील या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.

मात्र नेमके तोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या फेरलेखापरिक्षण म्हणजे काय ? व त्यामागील खरे सत्य नमके काय ? नेमका घडलेला गैरव्यवहार हा कुठे व कसा घडला ? तो संस्था स्तरावर की बॅक स्तरावर घडलेला आहे ? यातील नेमके दोषी व आरोपी कोणते ? यांच्यावर आजपावतो का कोणतीही कार्यवाही झाली नाही ? मग यामागचे खरे सुत्रदार व वरदहस्तक कोण ? कायदा काय सांगतो ? त्यात संस्था नोंदणी अधिकारी याची भूमिका काय असायला हवी होती ? व ती का घेतली नाही ?  व बनावट घोडे कसे नाचवण्यात आलेत ? यात कोण-कोणत्या अधिका-यांनी आपले हात धुतले असण्याची शक्यता घटनाक्रम व कायद्यातील तरतुदीवरून कसे ठरवता येऊ शकते ? अधिका-यांनी आपल्या अधिकाराचा आवश्यक तेथे तोटाकाच वापर का केला ? व नको तेथे अवाजवी वापर का केलारुजूवाती का घेतले ? कोणी कोणी घेतले ? त्या मध्ये नेमके काय म्हटलेले आहे ? या गैरव्यवहाराची चौकशी व तपासणी कोणी घेतली ? काय म्हटलेले आहे त्या चौकशी अहवालात ? हे सर्व आम्ही आता पुराव्यासह सादर करणार आहोत ? तोंदे सोसायटीच्या नावावर घडवलेला गैरव्यवहार त्याच वेळेस असाच गैरव्यवहार शहादा तालुक्यात देखील एका सोसायटीत घडलेले होते. त्यात लेखापरीक्षकांनी काय भूमिका घेतली ? व कोणाच्या सांगण्यावर घे
तली ? इतकेच नव्हे तर या बॅकेतील आजवर घडलेले सर्वच घोंटाळे, मग त्यात तळोदा शाखा घोटाळा असो, शिरपूर तालुक्यातील बँक कर्मचाऱ्यांचा सावकारी व्यवसायाचा बचत गट घोटाळा असो,तोंदे वि.का.सोसायटीच्या नावावर घडलेला, घोटाळा असो किंवा शहादा तालुक्यातील ..... सोसायटी घोटाळा असो चे सर्व आम्ही संपूर्ण पुराव्यांसह आम्ही जनतेसमोर सादर करणार आहोत. सर्व घोटाळ्याची एक पुर्ण मालिकाच आम्ही लावणार आहोत. म्हणजेच आपणास कळेल की “एक सही शेतकरी हितासाठी” ही मोहीम किती महत्वाची आहे ते ? अन्यथा बँक कर्मचारी व त्यांचे प्रशासन हेच शेतकऱ्यांची बँक भुईसपाट करून आपली तिजोरी भरून निघून जातील व शेतकऱ्यांना हात चोळत बसावे लागतील याची जाणीव आमच्या या खुलाशातून सर्वांनाच येईल. इतकेच नव्हे तर तोंडे विकास संस्थेचे दप्तर व रेकॉर्ड हे नेमके कुणाकडे असू शकते याचे सर्व लिखीत पुरावे आम्ही सादर करणार आहोत इतकेच नव्हे तर प्रत्येक बातमीचा छापील पेपर हा विभागीय सहनिबंधक व सहकार आयुक्त यांना पाठवण्यात येणार आहे. 

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाणारे व शेतकऱ्यांकडून विनापरवाना सावकारी रूपाने व्याजाची वसुली करणाऱ्या बचत गट  घोटाळ्यातील अपराधींसह तर घोटाळ्यातील दोषींवर कायमची निलंबनाची कारवाई करत नाही व सावकारी गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आता शांतता नाहीच नाही...!

(अजून वाचा सविस्तर पुढील अंकात....)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध