Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
सामाजिक कार्यकर्ते मनिष अहिरराव यांचा कुडुन ग्रा.पं.धाडणे येथे बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविणे बाबत सरपंच व ग्रामसेवक याना निवेदन देण्यात आले
सामाजिक कार्यकर्ते मनिष अहिरराव यांचा कुडुन ग्रा.पं.धाडणे येथे बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविणे बाबत सरपंच व ग्रामसेवक याना निवेदन देण्यात आले
राज्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये असे निर्दशनास येत आहे कि, ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना अनेकदा कार्यालयात भेटत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचा आणि वेळेचा खोळंबा होतो.ग्रामस्थाना ग्रा.पं.धाडणे कार्यालयाबाहेर ग्रामविकास अधिकारी याची कामा निमित्त वाट पाहताना कित्येकदा बघितले आहे तासनतास वाट बघत असतात ह्यातच शेतीची तसेच इतर दैंनदिनी कामाचा मात्र खोंळबा होतो याला आवर घालण्यासाठी आता कोकणातील ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी एका पत्राद्वारे राज्यातील कोकण/ पुणे /नाशिक /औरंगाबाद/अमरावती/ नागपुर इ.विभागीय आयुक्तांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली लागु करण्याचे निर्देश दिले आहेत व प्रवेश द्वारावर जन माहीती अधिकारी फलक लावण्याबाबत सांगण्यात आले आहे.याचाच सामाजिक कार्यकर्ते चि.मनिष अहिरराव यानी सदर्भ घेत .
1) दि.14/01/2023 रोजीचे रत्नागिरी टाईम्स वृत्तपत्रातील वरील विषया संर्दभात प्रसिद्ध बातमी. व 2) क्र. संकीर्ण -2022/प्र. क्र.867/आस्था-7 दि. 5 जानेवारी 2023 संदर्भिय क्र.1 ते 2 चे परिपत्रकानुसार त्या पत्राचा आशय लक्षात घेत धाडणे ग्रामपंचायतीच्या कारभारात अधिक पारदर्शकता येण्याच्या हेतूने व ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवेकांच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी म्हणुन ग्रामपंचातीमध्ये विनाविलंब बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावे हि अशी विनंती मनिष अहिरराव यांनी .संरपच यांना केली आहे बायोमॅट्रीक चे मशिन घेऊन पाच महिने झाले आहेत असे कैशबुक पडताळणी अंती समजले कित्येकदा ग्रामविकास अधिकारी श्री.जे.पी.वळवी यांना सागुन देखील मशिन बसवण्यात आले नाही बरेचसे ग्रामस्थ कार्यालयातुन ग्रामविकास अधिकारी नसल्याने माघारी फिरतात त्याच्यां समस्या सुटत नाही कागदपत्राचे कामे होत नाही असे निवेदनात म्हटले आहे बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात कोणताही विंलब करू नये असे देखील नमुद केले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा