Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
मंत्री छगन भुजबळ यांचे नाशकात पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून पुष्पवर्षाव करत वाजतगाजत जल्लोषात स्वागत फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांवर आपली वाटचाल कायम सुरूच राहील – मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांचे नाशकात पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून पुष्पवर्षाव करत वाजतगाजत जल्लोषात स्वागत फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांवर आपली वाटचाल कायम सुरूच राहील – मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.८ जुलै :- राज्यातील शेतकऱ्यांचे, मजुरांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी आपले काम अविरत सुरु राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपली वाटचाल कायम सुरूच राहील असे प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदी शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे आज पहिल्यांदा नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले. मुंबईतून सांताक्रुझ येथील निवासस्थान येथून नाशिककडे निघाल्यावर ठाणे, मुलुंड, मानकोली नाका,कल्याण जंक्शन राजनोली, वाशिंद,इगतपुरी,घोटी, रायगड नगर,शहरातील पाथर्डी फाटा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्याची आतषबाजी करत फुलांचा वर्षाव करून वाजतगाजत जंगी स्वागत केले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे जल्लोषात स्वागत झाल्यावर येथील कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ हेही होते.
पाथर्डी फाटा ते भुजबळ फार्म पर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत
छगन भुजबळ यांचे नाशिक शहरात पाथर्डी फाटा परिसरात आगमन होताच पाथर्डी फाटा ते भुजबळ फार्म पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी क्रेनच्या सहायाने मोठा पुष्पहार घालण्यात आला. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करत स्वागत केले. दरम्यान नाशिक शहरात पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी युवकांनी बाईक रैली काढत त्यांचे स्वागत केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा