Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ जुलै, २०२३

महामार्ग पोलीस दहिवद शिरपूर वाहतुक महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी सामाजिक बांधिलकी जपत महामार्ग पोलीसांच्या वतीने कोळसापाणी येथे एक लाखांची आर्थिक मदत...!



शिरपूर प्रतिनिधी:- ४ जुलाई २०२३ रोज़ी पळासनेर येथील भीषण अपघाताच्या घटनेत शिरपूर तालुक्यातील कोळसापाणी या पाड्यावरील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.या भीषण घटनेनंतर सामाजिक बांधिलकी जपत शिरपूर महामार्ग पोलीसांच्या वतीने कोळसापाणी येथे एक लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

पळासनेर अपघातात ०९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.या घटनेत पळासनेर गावाजवळील कोळसापाणी या पाड्यातील 5 जणांचा मृत्यू झाला होता.या घटनेनंतर मा.श्री रवींद्र सिंगल सो.,अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या निर्देशाने ,श्री मोहन दहिकर सो.पोलीस अधीक्षक,
महामार्ग पोलीस ,ठाणे परिक्षेत्र,श्री प्रदिप मैराले सो.,पोलीस उप अधीक्षक, महामार्ग पोलीस,नाशिक विभाग,श्री हेमंतकुमार भामरे सो.पोलीस निरीक्षक ,महामार्ग पोलीस,धुळे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पवार व पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांच्यासह संपूर्ण महामार्ग पोलीस शिरपूर अमलदारांच्या वतीने कोळसापाणी गावाला सामाजिक बांधिलकी म्हणून एक लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

आम्ही धुळे येथील हिरे वैद्यकीय मेडिकल रुग्णालय येथे जाऊन जखमींची प्रत्यक्ष पणे विचारपूस केली.
अपघातात कोळसापाणी येथील चांदणी पिंटु पावरा हिची आई आणि बहिण गंभीर जखमी झाले तर भाऊचा मृत्यू झाला व दोन ते तीन वर्षापूर्वी चांदणीच्या वडीलांचे निधन झाल्याने चांदणी आणि तीच्या आईच्या नावाने शिरपूर भारतीय पोस्ट कार्यालयात खाते उघडून एन एस सी योजनेअंतर्गत खात्यात चांदणीच्या नावे 51 हजारांची रक्कम पाच वर्षाच्या मुदतीवर ठेवण्यात आले आहे.तर या अपघातात बबीता पावरा हिचे वडील आणि भाऊचा मृत्यू झाल्याने तीच्या नावे देखील भारतीय पोस्ट कार्यालयात खाते उघडून 30 हजारांची रक्कम एन एसी सी योजनेंतर्गत पाच वर्षाच्या मुदतीसाठी ठेवण्याथ येणार आहे.

आज दी.०८/०७/२०२३ रोजी आम्ही,उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांच्यासह संपूर्ण अमलदार पथक कोळसापाणी येथे अपघातात मृत झालेल्यांच्या घरी सांत्वनासाठी पोहचले होते.यावेळी चांदणीच्या नावे असलेले 51 हजारांचे पोस्ट कार्यालयातील एन एस सीचे कागदपत्रे, कपडे,शालेय साहित्य चांदीणीला यावेळी देण्यात आले तर बबिता हिच्या आईकडे देखील 30 हजारांची रक्कम,शालेय साहित्य व कपडे देण्यात आले.तर ईतर दोन कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजारांची मदत करण्यात आली.यावेळी आम्ही वाहतूक सुरक्षतेबाबत मार्गदर्शन केले.तर मनोज पावरा यांनी आदीवासी बोली भाषेत वाहतूक सुरक्षतेची माहिती दिली.
मा.सविनय सादर
नरेंद्र पवार,पोऊनी
प्रभारी अधिकारी
म.पो.केंद्र,शिरपुर
जि.धुले






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध