Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ जुलै, २०२३

कृषी भरारी पथकाची दमदार कामगिरी धुळे एम आय डी सी मधील बोगस रा.खताचा कारखानावर कायदेशीर कारवाई करत. सुमारे 14 ते 15 लाखाचा मुद्देमाल जप्त



आज दि.०८.०७.२०२३ रोजी गुप्त माहीतीच्या आधारे श्री.अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,धुळे यांना एम.आय.डी.सी धुळे संशयित व बनावट १८:१८:१० मिश्र खतांच्या बॅग भरण्याचे काम सुरू असताना भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली.
संशयित भुमी क्राॅप सायन्सचे प्रोपरायटर नरेंद्र श्रीराम चौधरी याने मे.फार्मा सन्स फर्टीकेम प्रा.लि या उत्पादकाकडून संशयित बनावट १८:१८:१० हे मिश्र खत मे.ग्रीनफिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा.लि.यांच्या १८:१८:१० या मिश्र खताच्या बॅगमध्ये भरुन विक्री करत होते.
रक्कम रु.१३,३५,४००/-मुल्याचे   १००० बॅग जप्त करुन  
संशयित भुमी क्राॅप सायन्सचे  प्रोपरायटर नरेंद्र श्रीराम चौधरी , मे.फार्मा सन्स फर्टीकेम प्रा.लि व मे.ग्रीनफिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा.लि. यांच्या विरोधात भा.दं.वि ४६५,४६८,३४ ,खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम ७,१२,१३(१)(२),१९ c(ii)(iii)(iv)(vi),३५ व जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ मधील कलम ३(२) व ७ अन्वये मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई मा.मोहन वाघ , विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक, श्री.कुरबान तडवी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ,धुळे,
श्री.बापुसाहेब गावीत, उपविभागीय कृषी अधिकारी धुळे,श्री.नितेंद्र पानपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग,श्री.प्रकाश तालुका कृषी अधिकारी धुळे,श्री.प्रदिप निकम, मोहीम अधिकारी,श्री.अभय कोर,श्री.राजेश चौधरी, कृषी अधिकारी पंचायत समिती हे उपस्थित होते.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री.भुषण कोते करीत आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध