Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ जुलै, २०२३
भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकासह तिघे जाळ्यात...! तीन लाखांची लाच भोवली..!
जळगाव प्रतिनिधी:- बायोडिझेलच्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच मंगळवारी सायंकाळी अटक केली.धुळे एसीबीच्या या कारवाईने पोलीस वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
तडजोडीअंती स्वीकारली तीन लाखांची
लाच
एका प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागून तीन लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली.पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहाय्यक निरीक्षक सांगळे यांच्यासाठी खाजगी हस्तक ऋषी शुक्ला व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचा रायटर तुषार पाटील यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. बोदवड तालुक्यातील मनुर फाट्याजवळ ऋषी शुक्ला यास लाच घेताना पकडण्यात आले व नंतर पोलीस निरीक्षकांचा लाच प्रकरणात सहभाग स्पष्ट होताच त्यांनाही अटक करण्यात आली,
असे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, हवालदार राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला,
हवालदार चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा